Agriculture news in Marathi, rain stop in district, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

सांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसावर एक लाख ६६ हजार हेक्टरवर पेरणी झाली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यातच मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि सोयाबीनवर गोगलगायीचा हल्ला झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

सांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसावर एक लाख ६६ हजार हेक्टरवर पेरणी झाली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यातच मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि सोयाबीनवर गोगलगायीचा हल्ला झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र २ लाख ७७७ हजार ६८० हेक्टर असून त्यापैकी १ लाख ६६ हजार १४४ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात पावसाने उशिरा सुरवात केली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यास विलंब झाला. १ जून ते १५ जुलै या दरम्यान जिल्ह्यात १७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात धूळवाफेवर भाताची पेरणी केली जाते. ही पेरणी शंभर टक्के झाली आहे. शिराळा तालुक्यात पाऊस असल्याने भात पिके जोमाने वाढली आहे. वास्तविक पाहता, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांत पेरणी झाली आहे. 

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर या तालुक्यांत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण पाऊस नसल्याने त्याची उगवण झाली नाही. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. टॅंकरवरच्या पाण्यावर तहान भागवले जात आहे. अजूनही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला नाही.

रोगाचा प्रादुर्भाव
सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, तासगाव, कडेगाव या तालुक्यांत सोयाबीनवर गोगल गायींनी हल्ला चढविला आहे. या तालुक्‍यातील अनेक गावांतील सोयाबीनचे क्षेत्र गोगलगायीमुळे बाधित झाले आहे. या अचानक आलेल्या गोगल गायीच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वाळवा, तासगाव तालुक्यांतील जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. तर जत तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या पिकांचे पंचनामे करावे व भरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जूनच्या पावसावर पेरणी केली होती. पुन्हा पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पेरणी केलेले उगवले नाही. दुबार पेरणीचं संकट आले आहे. दुबार पेरणी केली तरी उगवण होणार का असा प्रश्न पडला आहे.- भीमराव पाटील, हळ्ळी, ता. जत


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...