Agriculture news in marathi Rain stop in Risod | Agrowon

रिसोडमध्ये पावसाची उघडीप

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

वाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ घालत असताना रिसोड तालुक्यातील बहुतांश गावे गेल्या १२ ते १५ दिवसांपासून पावसाविना आहेत.

वाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ घालत असताना रिसोड तालुक्यातील बहुतांश गावे गेल्या १२ ते १५ दिवसांपासून पावसाविना आहेत. पावसात मोठा खंड पडल्याने शेतकरी आता त्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे. 

यंदाच्या हंगामात आतापर्यंत या तालुक्यात लहरीस्वरुपाचा पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. हे पीक फुलोरावस्थेत आहे. त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. यावर्षी पावसाळा लवकर सुरु झाला. सुरुवातीपासूनच चांगला पाऊस दिसत असला तरी काही शेतकऱ्यांवर निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. आता पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

रिसोड, मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. या दरम्यान जो पाऊस झाला, तो हलक्या स्वरुपाचा आहे. आता पाऊस नसल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. दिवसभर तापमान वाढल्याने याचा पिकावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. कडक ऊनही तापत आहे. पाऊस न आल्यास सोयाबीन पिकाला फटका बसणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...