खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षा

जळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला. परंतु, काळ्या कसदार जमिनीत वाफशाचा अभाव आहे. शेतीकामे ठप्प आहेत.
 The rain stopped in Khandesh, waiting for the wind
The rain stopped in Khandesh, waiting for the wind

जळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला. परंतु, काळ्या कसदार जमिनीत वाफशाचा अभाव आहे. शेतीकामे ठप्प आहेत. 

शुक्रवारीदेखील (ता.२५) कोरडे व सूर्यप्रकाशीत वातावरण होते. अधूनमधून ढग येत होते. परंतु, लागलीच ऊन पडायचे. हा खेळ सकाळपासून सुरू झाला. खानदेशात तापी, गिरणा, गोमाई, पांझरा, अनेर, वाघूर, अंजनी, सुसरी, मोर आदी नद्यांच्या काठी काळी कसदार जमीन आहे.

गेले २२ ते २३ दिवस सतत पाऊस सुरू आहे. यामुळे काळ्या कसदार जमिनीतील पिकांची अवस्था बिकट बनली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरीदेखील तणनाशकांची फवारणी, अर्धवट उमललेली कापसाची बोंडे वेचणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. 

सोमवार (ता.२१) ते बुधवार (ता.२३) खानदेशात सर्वत्र जोरदार, अतिजोरदार पाऊस झाला. सातपुडा पर्वतालगत जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नवापूर या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले.

अतिपावसाने घरांचीदेखील अनेक भागात हानी झाली. काही भागात केळी, कापूस, तूर, ऊस ही पिके वादळी पावसात भुईसपाट झाली. तूर, मूग, उडीद, कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. 

आता रब्बी हंगामाबाबत आशा आहेत. कारण मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी करावी लागणार आहे. या पेरणीसाठी पूर्वमशागत करावी लागेल. शेती अतिपावसात कडक झाली आहे. माती वाहून गेल्याने सुपीक घटकांचे नुकसान झाले आहे. 

शेतरस्ते खराब

ट्रॅक्टरने पूर्वमशागत करावी लागेल. पण, अतिपावसाने शेतरस्ते खराब आहेत. शेतांमध्ये वाफसा नाही. यामुळे पूर्वमशागत किमान आठ दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशीत, कोरडे वातावरण राहील्यानंतर करता येईल. रब्बीमध्ये कोरडवाहू शेतीधारक शेतकरी हरभरा, दादर ज्वारी पेरणीचे नियोजन करीत आहेत. हरभऱ्याची मोठी  पेरणी तापी, गिरणा, पांझरा, अनेर, गोमाई आदी  नद्यांकाठी होईल, असे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com