agriculture news in Marathi rain stopped in kokan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने उसंत घेतली आहे.

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने उसंत घेतली आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी भागातील पूरपरिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विस्कळित झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिक घरांबाहेर पडत असून उद्ध्वस्त झालेल्या घर आणि शेतीच्या कामांमध्ये गुंतले आहेत. 

गेल्या पंधरा दिवसांपासून कोकणात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे शेती पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. सध्या या नुकसानीचे काही ठिकाणी पंचनामे सुरू झाले आहेत. कोल्हापूर, सांगली, कोकणात अजूनही पंचनाम्यांना सुरूवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करू लागले आहेत. राज्यात मंगळवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगडमधील माथेरान, ठाण्यातील शहापूर येथे अवघा ४० मिलिमीटर पाऊस पडला. पालघरमधील जव्हार येथे ३१, रायगडमधील 
माणगाव ३७, म्हसळा ३८, पोलादपूर ३१, रोहा ३२, रत्नागिरीमधील मंडणगड ३० मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. 

मध्य महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव चांगलाच कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्चिम भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू असली तरी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या दुथडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८५.२ मिलिमीटर पाऊस पडला. कोल्हापूरमधील आजरा ३४, गगनबावडा ३३, राधानगरी ५८, नाशिकमधील हर्सूल ४१.६, इगतपुरी ५२, ओझरखेडा ३५.२, पेठ ४२.२, सुरगाणा ६५.३, त्र्यंबकेश्वर ६६, पुण्यातील लोणावळा कृषी ४०.२, पौड ३३, वेल्हे ४५ मिलिमीटर पाऊस 
पडला. 

मराठवाडा व विदर्भातही पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी ऊन पडत आहे. काही ठिकाणी पावसासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या. पावसामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे. तर नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या भागातील शेताशेतातील पाणी पातळी ओसरली आहे. त्यामुळे शेतीकामांना पुन्हा सुरूवात होऊ लागली आहे. 

राज्यात मंगळवारी (ता.२७) सकाळपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : 
कोयना ४६, धोम बलकवडी ५१, धोम १०, कण्हेर ८, डिंभे २८, पानशेत ३९, वरसगाव ३८, खडकवासला १२, पवना २३, आंध्रा २२, निरा देवघर ४०, भाटघर १७, वारणा २७, दूधगंगा २४, राधानरी ८४, दारणा ३०, गंगापूर ३०, भंडारदरा ९७, इरई १५, भातसा ३२, सुर्याधामणी ४०, वैतरणा ५७. 
 

 
 


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...