कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पश्‍चिमेकडील काही तालुके वगळता पावसाने रविवारी दुपारपर्यंत पूर्ण उघडीप दिली. शाहुवाडी तालुक्‍यात सर्वाधिक १८.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात १६ मि.मी. पाऊस झाला. हातकणंगले, शिरोळ वगळता इतर तालुक्‍यात १ ते ५ मि.मी. पाऊस झाला. शिरोळ, व हातकणंगले तालुक्‍यात १ मि.मी. पावसाची नोंद झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांतील पाण्याच्या विसर्गात वीस टक्केपर्यंत कपात केल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास नद्यांचे पाणी पात्रात जाण्याची शक्‍यता असल्याचे आपत्कालीन विभागातून सांगण्यात आले. रविवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात २७ बंधारे पाण्याखाली गेले होते.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात, भोगावती नदीवरील हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे हे तीन बंधारे, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी व खोची हे तीन बंधारे, दूधगंगा नदीवरील सुळंबी, सुळकुड, सिद्धनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे व तुरूंबे हे सात बंधारे, कासारी नदीवरील यवलूज हा एक बंधारे तर वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरुपली, बस्तवडे व चिखली हे सहा बंधारे पाण्याखाल होते.

बंधाऱ्यांची पाणीपातळी कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २४ फूट १ इंच, सुर्वे २४ फूट, रुई ५५ फूट ६ इंच, इचलकरंजी ५२ फूट ६ इंच, तेरवाड ५० फूट ६ इंच, शिरोळ ४५ फूट, नृसिंहवाडी ४४ फूट इतकी होती. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी उघडीप राहिली. काही काळ सूर्यदर्शनही झाल्याने शेतकऱ्यांत थोडेसे समाधान पसरल्याचे चित्र होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com