agriculture news in Marathi, rain stopped in Kolhapur, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोल्हापुरात पावसाची उसंत; नद्यांची पाणीपातळी स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी (ता.९) सकाळपासून पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तूर्त धोका टळला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी इशाऱ्याची पातळी ओलांडून वाहत होते. तर, नाशिक, नगर, वर्धा, भंडारा, औरंगाबाद आणि पुर्व विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला.  

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी (ता.९) सकाळपासून पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तूर्त धोका टळला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी इशाऱ्याची पातळी ओलांडून वाहत होते. तर, नाशिक, नगर, वर्धा, भंडारा, औरंगाबाद आणि पुर्व विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला.  

सोमवारी दुपारी पाण्याची पातळी स्थिर झाल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. चिखली आंबेवाडीसह शिरोळ तालुक्‍यतील राजापूर, खिद्रापूर गावातील लोकांना स्थलांतरासाठी आवाहन करण्यत येत होते. महापुराचा फटका बसलेल्या चिखलीतील ग्रामस्थांनी रविवारी वेळ न घालविता जनावरासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रारंभ केला. रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यातच पाणी स्थिर झाल्याने सोमवारी दिवसभर स्थलांतराची घाई करण्यात आली नाही. 

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा राधानगर धरणाचे केवळ दोन दरवाजे खुले राहिले. यातून ४२०० क्सु‍सेक पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. कोयना धरणातूनही पाणी सोडण्याचे प्रमाण कमी केले. ६९००० क्सु‍सेकवरून हे प्रमाण सोमवारी दुपारपर्यंत ४५००० क्सु‍सेक पाणी कमी झाले. परिणामी कृष्णा नदीच्या पाण्यातही मंद वाढ राहिली. 

आलमट्टी धरणातूनही विसर्ग रविवारच्या तुलनेत सोमवारी २०००० क्सु‍सेकने वाढविण्यात आला. यामुळे पाण्याचा निचरा होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. सध्या जिल्ह्यात विविध नद्यांवरचे ६८ बंधारे पाण्याखाली आहे. एफडीआरएफच्या तुकड्या बोलावण्यात आल्या असल्या, तरी अद्याप कुठेच बचावकार्य सुरू नसल्याची प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली.

अपवाद वगळता नागरी वस्तीत पाणी शिरले नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही पथके गावामध्ये थांबून आहेत. सोमवारी दुपारनंतर पाणी वाढले नसले तरी पाणी ओसरण्यास वेळ लागण्याची शक्‍यता असल्याने शिवारांमध्ये पुढील तीन ते चार दिवस तरी पाणी कायम राहिल, अशी शक्‍यता आहे. यामुळे शेतकामे सुरू करण्याच्या प्रयत्न थंडावण्याची शक्‍यता असल्याचे सध्याचे चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमध्ये सुरु असलेला विसर्ग (क्युसेक)
सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार राधानगरी धरणातून ४२००, कोयना धरणातून ४५०००, तुळशी धरणातून १०११, कुंभी प्रकल्पातून ९५०, कासारीतून ११००, वारणेतून ११८९४; तर दुधगंगा धरणातून ५४०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरू होता. 

नाशिक जिल्ह्यात पाऊस
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून तुळतक पाऊस सुरु असल्याने गंगापूर, भावली, दारणा व नांदूर मध्यमेश्वर या धरणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे. मात्र सोमवारी (ता.९) पावसाचा जोर दुपारी वाढल्याने धरणांतून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. गंगापूर, दारणा, भावली, आळंदी, कश्यपी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...