agriculture news in marathi, rain stopped in state, Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची उघडीप; उकाड्यात वाढ
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 जुलै 2018

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ढगाळ हवामान असले, तरी ऊन पडत असल्याने तापमानात वाढ होऊन, उकड्यातही वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. १) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. जवळपास आठवडाभर पावसाची उघडीप राहणार असल्याने कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ढगाळ हवामान असले, तरी ऊन पडत असल्याने तापमानात वाढ होऊन, उकड्यातही वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. १) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. जवळपास आठवडाभर पावसाची उघडीप राहणार असल्याने कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मॉन्सूनच्या पावसामुळे राज्यातील कमाल व किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढू लागला होता. मात्र, या आठवड्याच्या सुरवातीपासूनच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात तापमानाचा पारा २७ अंशांच्या पुढे गेला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ३१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. जळगाव, डहाणू, परभणी, नांदेड येथे तापमान ३० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. शनिवारी दुपारनंतर उन्हाचा चटका जाणवत हाेता. उकाड्यातही वाढ झाली होती. 

पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत (ता. ३०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहे. बुधवारपर्यंत (ता.१) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज अाहे.

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, उर्वरित राज्यात कोरडे हवामान होते. कोकणातील शिरगाव येथे ५५ मिलिमीटर, खेड २१, धामनंद २२, सवंडल ५५, कुंभवडे ३३; तर मध्य महाराष्ट्रातील शेंडी येथे २० मिलिमीटर, हेळवाक ३६, उब्रंज ३०, तापोळा ५८, लामज ७५, वाडी-रत्नागिरी २२, बाजार २१, करंजफेन ३३, आंबा ६३, साळवण ५७, गवसे येथे २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

शनिवारी (ता.२८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २६.४, नगर २७.४, जळगाव ३०.०, कोल्हापूर २४.९, महाबळेश्वर १९.१, मालेगाव २९.४, नाशिक २७.०, सातारा २५.१, सोलापूर २९.५, मुंबई २८.५, अलिबाग २८.३, रत्नागिरी २८.३, डहाणू ३१.०, आैरंगाबाद २७.८, परभणी ३०.४, नांदेड ३१.०, अकोला २९.९, अमरावती २८.४, बुलडाणा २७.२, ब्रह्मपुरी २९.९, चंद्रपूर ३१.४, गोंदिया २८.५, नागपूर २९.३, वर्धा २९.४, यवतमाळ २८.५.

इतर अॅग्रो विशेष
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...