agriculture news in Marathi, rain stopped in state, Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची उघडीप; हलक्या सरींचाच अंदाज

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी (ता. १०) सकाळपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. अनेक भागांत दोन आठवड्यांनतर सूर्यदर्शन झाले आहे. शनिवारी दिवसभर ऊन, सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडल्या. आज (ता. ११) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी (ता. १०) सकाळपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. अनेक भागांत दोन आठवड्यांनतर सूर्यदर्शन झाले आहे. शनिवारी दिवसभर ऊन, सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडल्या. आज (ता. ११) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात एकामागून एक तयार होत असलेली कमी दाब क्षेत्रे, त्यास पूरक असलेला मॉन्सूनचा आस या पोषक स्थितीमुळे मॉन्सून सक्रिय झाला. सुमारे दोन आठवडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला, तर अनेक ठिकाणी सातत्याने अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यात तळाशी असलेली धरणे गेल्या पंधरा दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने ओसंडून वाहिली. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर जिल्ह्यात अभुतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. 

शनिवारी (ता. १०) गुजरात आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे या भागात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरत गेला. शनिवारी राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. धरणांमधील आवक कमी झाल्याने पाण्याचा विसर्गही कमी करण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली असून, पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

दरम्यान सोमवारपर्यंत (ता. १२) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओडीशा, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पूर्व भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी केरळमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, कोकणातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   

शनिवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : 
कोकण : वैभववाडी १००, माथेरान, राजापूर प्रत्येकी ८०, खालापूर, कुडाळ प्रत्येकी ७०, भिरा ६०, जव्हार, मंडगणगड, मोखेडा, शहापूर प्रत्येकी ५०, देवगड, दोडामार्ग, कणकवली, संगमेश्वर, देवरूख, सावंतवाडी प्रत्येकी ४०. 
मध्य महाराष्ट्र : आजरा १९०, राधानगरी १८०, महाबळेश्वर १७०, त्र्यंबकेश्वर १५०, पौड १४०, चंदगड, गारगोटी ११०, अक्कलकुवा, इगतपुरी, शिरपूर १००, नंदूरबार, पन्हाळा, पाटण प्रत्येकी ८०, भोर, गडहिंग्लज, जावळीमेढा, शाहूवाडी प्रत्येकी ७०, कागल, लोणावळा, पेठ, तळोदा प्रत्येकी ६०, घोडगाव, धाडगाव, शहादा, सुरगाणा प्रत्येकी ५०, हर्सुल, शिराळा, सिंदखेडा प्रत्येकी ४०. 
मराठवाडा : अर्धापूर, हिमायतनगर, उमरी प्रत्येकी १०.
विदर्भ : अर्जनी मोरगाव ३०, लाखंदूर, धारणी, कोर्ची, रामटेक, कुरखेडा, नागभिड, देसाईगंज, चांदूरबाजार प्रत्येकी २०. 
घाटमाथा : शिरगाव १७०, ताम्हिणी, दावडी १२०, आंबोणे १००, डुंगरवाडी ८०, वाणगाव ७०, शिरोटा ६०, कोयना पोफळी प्रत्येकी ४०.


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...