agriculture news in Marathi, rain stopped in state, Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची उघडीप

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मोठी उसंत घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मोठी उसंत घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाणा आणि उत्तर राजस्थानकडे सरकले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा उत्तरेकडे सरकला असल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पुढील काही दिवस ही उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक ९० मिलिमीटर, तर कोयना नवजा, शिरगाव येथे प्रत्येकी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :कोकण : जव्हार, भिरा प्रत्येकी ४०, मालवण, सुधागड पाली प्रत्येकी ३०, मोखेडा, सावंतवाडी, मंडणगड, उल्हासनगर, माथेरान, माणगाव, वाडा, दोडामार्ग प्रत्येकी २०. 
मध्य महाराष्ट्र : अक्रणी ५०, तळोदा, पेठ, सुरगाणा, पौड प्रत्येकी ३०, ओझरखेडा, अक्कलकुवा, राधानगरी, गगणबावडा, हर्सुल प्रत्येकी २०, नवापूर, शाहूवाडी, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, गारगोटी, यावल, लोणावळा, दिंडोरी, शिरपूर, जावळी मेढा, माढा, खेड, चांदवड, बोधवड प्रत्येकी १०. 
विदर्भ : करंजालाड, नांदूरकाझी, बार्शी टाकळी प्रत्येकी २०, मुर्तिजापूर, नेर, बळापूर, अकोला प्रत्येकी १०. 
घाटमाथा : ताम्हिणी ९०, कोयना नवजा, शिरगाव 
प्रत्येकी ७०, आंबोणे, दावडी, डुंगरवाडी प्रत्येकी ५०, भिरा ४०, वळवण, भिवापूरी, शिरोटा, खोपोली, खंद प्रत्येकी २०.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...