agriculture news in Marathi rain stopped in state Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाचा जोर ओसरला 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर काही प्रमाणात जोर ओसरला आहे.

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर काही प्रमाणात जोर ओसरला आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगडमधील माथेरान येथे सर्वाधिक १७८.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी दिवसभर ऊन पडल्याची चित्र होती. 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र काही प्रमाणात सोसाट्याचे वारे वाहत आहेत. पाऊस ओसरल्यामुळे सिंधुदुर्गामधील तिलारी नदी 
वगळता इतर नद्यांच्या पाणीपातळीत घट होत आहे. तिलारी नदीची पाणीपातळी अजुनही इशारा पातळीनजीक आहे. वादळीवाऱ्यांमुळे घरे, गोठ्यांच्या पडझडीत वाढ होताना दिसत आहे. रत्नागिरीत पुराचे पाणी भात खाचरात कायम राहिल्यामुळे 
नदीकिनारी भागात नुकसान झाल्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कोल्हापुरातील धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नद्यांचे पाणी अजूनही वाढत आहे. जिल्ह्यातील २३ गावांतील दोन हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले होते. सांगली, साताऱ्यातील अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कऱ्हाड, वाई या तालुक्यात जोर अधिक होता. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगावमध्ये बऱ्यापैकी पाऊस होता. खडकवासला, भाटघर, पवना, गुंजवणी, वीर या महत्वाच्या धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोलापूर, नगर, नाशिक, खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवस मराठवाड्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी पावसाने उघडीप दिली. विदर्भातील अकोला व गडचिरोलीमधील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. 

१०० मिलिमीटरहून अधिक पावसाची ठिकाणे 
माथेरान १७८.४, वाडा १०५, भिरा १५७, महाड १४७, पोलादपूर १२६, रोहा ११८.२, तळा १०६,मंडणगड १४०, चंदगड ११८, गगणबावडा १२२, राधानगरी १४७, इगतपुरी १०८, लोणावळा कृषी १४४.४, महाबळेश्वर १५३.६, 

शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये) 
कोकण : सांताक्रुझ ७९.२, वसई ५७, विक्रमगड ७३, कर्जत ५१.२, खालापूर ४७, माणगाव ६८, म्हसळा ५८, मुरूड ६७, पेण ८०, सुधागडपाली ८८, चिपळूण ४४, गुहागर ७३.४, हर्णे ७३.४, खेड ४२, राजापूर ४५, संगमेश्वर ६३, दोडामार्ग ४०, 
सावंतवाडी ७०, वैभववाडी ४०, अंबरनाथ ९२, भिवंडी ५५, कल्याण ७६, शहापूर ४८, ठाणे ५९, उल्हासनगर ८८. 
मध्य महाराष्ट्र : आजरा ९७, पन्हाळा ९०, शाहूवाडी ६७, त्र्यंबकेश्वर ७०, पौड ६५, वेल्हे ९५. 
विदर्भ : अहेरी २४.२, एटापल्ली १७.३. 
 


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...