agriculture news in Marathi rain stopped in state Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व नदीच्या पाण्याच्या प्रवाहात घट होऊ लागली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. 

पुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व नदीच्या पाण्याच्या प्रवाहात घट होऊ लागली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत ऊन पडत असल्याने शेतीकामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरू झाल्याचे चित्र आहे.

कोकणात गेल्या काही दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऊन पडत असल्याने खोळंबलेल्या भात काढणी वाफसा स्थितीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भात काढणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. शेतकरीही बाहेर पडून शेती कामांना सुरूवात करू लागला आहे. पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर सह अनेक भागात सकाळपासून ऊन पडत आहे.

काही भागात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नसल्याची स्थिती आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास पिकांची मळणी होऊन शेतकरी रब्बीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. मात्र, खानदेशात अतिपावसात कापसाचे नुकसान झाले आहे. वेचणीनंतर साठा करून ठेवला जात आहे.

मराठवाड्यातही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्नानाबाद जिल्ह्यांत पाऊस नसल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. परभणी जिल्ह्यांत गेल्या काही दिवस झालेल्या पावसामुळे २७ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन काढणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. नांदेडमध्येही सततच्या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

अतिवृष्टीपूर्वी अवर्षणामुळे हजारो हेक्टरवरील ज्वारीचे पिके भुईसपाट झाले आहे. उमरा (ता. लोहा) शिवारात अवर्षणामुळे ज्वारीच्या मुळांना उन्नीचा प्रादुर्भाव झाला. तसेच कणसाला अळ्या लागल्यामुळे दाणे भरले नाहीत. 

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीचे पिके उन्मळून भुईसपाट झाल्याची स्थिती आहे. विदर्भातही पाऊस नसल्याने बाजरी, सोयाबीन पिकांच्या काढणीला चांगलाच वेग आला आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी शिडकावा होत असल्याने भात पिकांना फायदा होत असल्याने पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी काढणीला आले आहेत.

सोमवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)
कोकण : गुहागर २१, संगमेश्वर २७, दोडामार्ग १९, ठाणे १८.२,
मध्य महाराष्ट्र ः गगणबावडा १५, शिरोळ २५,
मराठवाडा : औंढा नागनाथ १२,
विदर्भ : पवनी ११.६, गडचिरोली १५.५.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...