वऱ्हाडात सलग तिसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस

वऱ्हाडात सलग तिसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस
वऱ्हाडात सलग तिसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस

अकोला  ः या भागात वऱ्हाडातील बहुतांश तालुक्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस येत आहे. सोमवारी (ता. २६) प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात दमदार पाऊस झाला. या तालुक्यात ४८. ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यांमध्ये सार्वत्रिक स्वरूपात पावसाची नोंद झाली.   संपूर्ण अकोला जिल्हा, बुलडाण्यातील काही भागांत गेले दोन दिवस रिमझिम पाऊस पडत होता. आता त्यामध्ये वाशीम जिल्ह्याचीसुद्धा भर पडली. मागील २४ तासांत वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. अनेक दिवसांच्या खंडानंतर हा पाऊस सुरू झाल्याने पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात १७ मिलिमीटर असा समाधानकारक पाऊस नोंद झाला. अकोला जिल्ह्यात तेल्हारा २१, पातूर २३.६ असा पाऊस झाला.  या जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस होत आहे. यामुळे शेतीतील कामे ठप्प पडली आहेत. 

बुलडाण्यात घाटावर चार तालुक्यांत चिंता वाढली बुलडाणा जिल्ह्यात मराठवाड्याच्या सीमेला लागून असलेल्या लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेहकर या तालुक्यांमध्ये या संपूर्ण वर्षात जोरदार पाऊस झालेला नाही. सध्याही या भागावर पावसाची अवकृपा कायम आहे. एकीकडे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असताना या भागात मात्र जेमतेम सरी येत आहेत. देऊळगावराजा तालुक्यात आत्तापर्यंत केवळ ४६.६९ टक्के, सिंदखेडराजा ५६.५९, लोणार ४८.९१ आणि मेहकर ५६.४१ असा पाऊस पडलेला आहे. मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यातील पीकपरिस्थिती बिकट होत चालली आहे.     

मंगळवारी सकाळपर्यंत झालेली पावसाची नोंद अकोला जिल्हा ः अकोला ९.८, बार्शीटाकळी ८.८, अकोट ८.५, तेल्हारा २१, बाळापूर १६.२, पातूर २३.६, मूर्तिजापूर ४.९, सरासरी १३.३  बुलडाणा जिल्हा ः बुलडाणा ३.५, चिखली ३.८, देऊळगावराजा २, सिंदखेडराजा १.३, लोणार १.२, मेहकर ४.७, खामगाव १७.८, शेगाव ८.२, मलकापूर ४८.६, नांदुरा १८.५, मोताळा १३.९, संग्रामपूर १०.८, सरासरी ११.८ वाशीम जिल्हा ः वाशीम २.३६, मालेगाव १७.१६, रिसोड १.९४, मंगरुळपीर ५.३२, मानोरा ३.५८, कारंजा ३.६९, सरासरी ५.६८ पूर्णेच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा  अमरावती, अकोला जिल्ह्यांतून पुढे बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या पूर्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. चांदूर बाजार तालुक्यात पूर्णा नदीवर असलेल्या पूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी येथे पूर्णा धरण आहे. पूर्णा नदीवरील या धरणात आत्तापर्यंत ८६.८१ टक्के जलसाठा झाल्याने धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले. धरणातून १५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com