नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८ तालुक्यांतील ९३ मंडळांत शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुगट (८४ मिमी), लोहगाव (८० मिमी) मंडळामध्ये पावसाचा जोर अधिक राहिला.

अनेक दिवसांच्या खंडानंतर गुरूवारी (ता.१८) पावसाचे आगमन झाले. त्यामुळे येथील खरीप पिकांना जीवनदान मिळाले. परंतु, अजूनही सर्वदूर पाऊस नाही. त्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके धोक्यात आहेत. दुबार पेरणीचे सावट कायम असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. अनेक मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिके आडवी पडली. मुदखेड, उमरी, बिलोली, नांदेड, कंधार, भोकर तालुक्यांतील अनेक तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. 

परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २७ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. सेलू, मानवत तालुक्यांतील काही मंडळांत अधिक  पाऊस झाला. वालूर (ता. सेलू) मंडळात सर्वाधिक ५८ मिलिमीटर पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १२ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. सेनगाव, वसमत तालुक्यांतील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

मंडळनिहाय पाऊस (मिमी) 

नांदेड जिल्हा नांदेड ५, नांदेड   ग्रामीण २४, वजिराबाद ८, वसरणी ६, तरोडा बुद्रुक १९, लिंबगाव २०, तुप्पा ९, विष्णुपुरी १३, अर्धापूर ६, दाभड २०, मुदखेड ४७, मुगट ८४, बारड ३१, भोकर २५, मोगाली ३०, उमरी २२, सिंदी २५, गोलेगाव २०, धर्माबाद १२, जारिकोट ४, करखेली १७, नायगाव २१, नरसी ३०, मांजरम १५, बरबडा १७, कुटूंर ९, बिलोली २८, सगरोळी १६, आदमपूर १८, लोहगाव ८०, शहापूर ६, मुखेड ४, जाहूर ८, चांदोला ५, कंधार ११, फुलवळ १५, उस्माननगर ९, बारुळ २६, पेठवडज ७, लोहा ११, माळाकोळी १२, कलंबर ८,  शेवडी १०, सोनखेड ९, कापसी २४. 
परभणी जिल्हा परभणी शहर ५, शिंगणापूर ५, झरी २२, पेडगाव ८, जांब ७, जिंतूर ६, बोरी ४, बामणी ५, सेलू १५, कुपटा ३२, वालूर ५८, मानवत ४, कोल्हा १६, पाथरी ३, बाभळगाव ४, ताडकळस ५, चुडावा २१, कात्नेश्वर ६, गंगाखेड ६. 
हिंगोली जिल्हा हिंगोली ९, नांदापूर ५, वारंगा फाटा ५, सेनगाव १६, हट्टा १८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com