नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
अॅग्रो विशेष
सिंधुदुर्गात वादळीवाऱ्यांसह पाऊस; काजू, आंब्याचे नुकसान
सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळी उशिरा विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या काजू पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळी उशिरा विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या काजू पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे तर आंबा पिकाला देखील अवकाळीचा तडाखा बसला आहे.
सह्याद्री पट्ट्यातील गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान वादळाने अनेक मार्गावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वीजवाहिन्यावर झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
जिल्ह्यात गुरुवारी सायकांळी तीन वाजल्यापासून सोसाट्याच्या वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर काही वेळातच विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर गारपिटीला सुरुवात झाली. पावसासोबत गारांचा खच जमिनीवर पडला होता. कणकवली, वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात जोरदार वादळ झाले.
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली, आर्चिणे, लोरे, खांबाळे, सडुरे, नावळे, सांगुळवाडी, नीम अरूळे, अरूळे, करूळ, कुंभवडे, भुईबावडा, ऐनारी या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावातील शेकडो हेक्टरमधील काजू पीक पूर्णतः वाया गेले आहे.
या शिवाय फोंडा, घोणसरी हरकुळ या गावातील काजू पिकाचे नुकसान झाले आहे. हिरवा काजू, काजुला आलेला मोहोर गळून पडला आहे. गारपिटीने काजूची पाने देखील फाटली आहेत. काजूच्या झाडांखाली हिरव्या काजूचा खच पडला आहे. हातातोंडाशी आलेले काजूचे पीक वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वैभववाडी तालुक्यात हजारो हेक्टर काजू पीक आहे. या भागात गेल्या पाच दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात काजू लागवड झाली आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादनक्षम काजू या भागात आहेत. परंतु अवकाळीने सर्व पीकच हिरावून घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.
आंबा पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला. परंतु वाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. पावसामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे-फोंडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्यामुळे तालुक्यातील अधिकतर गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता.