विदर्भ, मराठवाड्यात पाऊस

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांत पाऊस झाला.
onion
onion

अमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांत पाऊस झाला. काढणीस आलेल्या बाजरी, उन्हाळी मका, भाजीपाला व झाडाला लगडलेले आंबे गळून पडल्याने सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

अमरावती शहरातील अनेक ठिकाणी झाडांची मोठी पडझड झाली असून, वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रदेखील कोसळले आहे. या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले. यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. 

जळकोट (जि. लातूर) शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. त्यामुळे आंब्याच्या बागांची मोठ्या प्रमाणात कैरीची गळती होऊन नुकसान झाले. जालना जिल्ह्यात पारध, शहागड, पाथरवाला, कुरण येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मंठा तालुक्यात दुपारी तीन वाजेदरम्यान ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वालसावंगी परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. ढगाळ वातावरण व जोराचा वारा वाहतो आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात हजेरी  औरंगाबाद जिल्ह्यात ढोरकीन येथे वाऱ्यासह पाऊस झाला. गंगापूर शहरात आणि विहामांडवा येथे वाऱ्यासह दहा मिनिटे पाऊस झाला. जायकवाडीसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. खुलताबाद व परिसरात वादळी वाऱ्यासह रिमझिम झाला. अंभई, जरंडीला आणि फुलंब्री परिसरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com