विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला हुडहुडी

 पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा जिल्ह्यात सोमवारी (ता.१७) रिमझिम पावसाने हजेरी लावली.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा जिल्ह्यात सोमवारी (ता.१७) रिमझिम पावसाने हजेरी लावली.

पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’ च्रकीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले. सोमवारी (ता.१७) पूर्व विदर्भात पावसाच्या सरींनी हजेरी लावली, तर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने मध्य महाराष्ट्राला हुडहुडी भरली. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे नीचांकी तापमानाची नोंद होत पारा ८ अंशांपर्यंत घसरला, तर धुळे येथे हंगामातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस, निफाड (जि. नाशिक) येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  ‘पेथाई’ चक्रीवादळाने बाष्प खेचून अाणल्याने पूर्व विदर्भात पावसाला सुरवात झाली होती. भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत होत्या. सातत्याने पडणाऱ्या भिज पावसामुळे वाढीच्या अवस्थेतील रब्बी पिकांना लाभ होणार आहे. तर यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. विदर्भात आज (ता. १८) ढगाळ हवामानाचा अंदाज आहे.  उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे. कोकण आणि मराठवाड्यात तापमान सरासरीच्या जवळपास आहे, तर पावसाला पोषक हवामानामुळे विदर्भाच्या किमान तापमान वाढ झाली. सोमवारी मध्य महाराष्ट्राच्या तापमानात १ ते ३ अंशांची घट झाली होत तापमान १० अंशांच्या खाली आले होते. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे तापमान ८ अंशांच्या जवळ आल्याने हुडहुडी वाढली. राज्यात आज थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. 

विजयवाडा शहरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जमीन खचून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. वादळामुळे विमान सेवा आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील गाड्याच वेळापत्रक कोलमडले आहे. वादळामुळे किनारपट्टीय भागातील शाळांना एक दिवसाची सुटी देण्यात आली अाहे. वादळाची तीव्रता ओसरत असून, उद्या (ता.१८) आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड पावसाची शक्यता आहे. तर आसाम, मेघालयासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

सोमवारी (ता.१७) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ८.३(-३), नगर ८.७(-३), जळगाव ८.४ (-३), कोल्हापूर १५.७(१), महाबळेश्‍वर १०.४(-३), मालेगाव १०.० (-१), नाशिक ८.५(-२), सांगली ११.९(-१), सातारा ११.४ (-१), सोलापूर १४.०(-१), सांताक्रुझ १९.०(१), अलिबाग १८.२(०), रत्नागिरी १९.०(-१), डहाणू १६.२(-२), आैरंगाबाद ११.०(०), परभणी १२.५ (-१), नांदेड १४.५ (३), उस्मानाबाद १२.२, अकोला १४.५(१), अमरावती १५.६(१), बुलडाणा ११.६ (-३), चंद्रपूर १३.४(०), गोंदिया ११.५(-१), नागपूर १५.६(३), वर्धा १७.७(५), यवतमाळ १५.१ (१). ‘पेथाई’ धडकले बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेले ‘पेथाई’ चक्रीवादळ सोमवारी (ता. १७) दुपारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर असलेल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात धडकले. वादळी वाऱ्यासह अालेल्या मध्यम ते जोरदार पावसामुळे किनारपट्टीय भागातील जनजीवन विस्कळित झाले. ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह ‘पेथाई’ चक्रीवादळ ‘कात्रेनीकोणा’ येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास धडकल्याचे राज्य सचिवालयाकडून स्पष्ट करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com