agriculture news in Marathi rain weak in Kokan Maharashtra | Agrowon

कोकणात पावसाचा जोर ओसरला 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. रायगडमधील माथेरान येथे ११६ मिलिमीटर पाऊस झाला.

पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. रायगडमधील माथेरान येथे ११६ मिलिमीटर पाऊस झाला. नद्यांतील पाणीपातळी काही प्रमाणात कमी झाली असली तरी धरणांत आवक सुरू आहे. मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी तुरळक सरी पडत असल्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली. 

गेल्या आठवड्यापासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. माथेरान, सावंतवाडी वगळता उर्वरित भागात शंभर मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने धरणातील वाढलेली पातळी कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नाशिक, नगर, सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाचा सरी कोसळत आहेत. अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. गगनबावडा येथे ११२ मिलिमीटर पाऊस पडला. तर चंदगड, राधानगरी, शाहूवाडी, लोणावळा, महाबळेश्‍वर येथेही पावसाच्या जोरदार सरी पडल्या. 

राज्यात रविवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) : स्रोत ः हवामान विभाग 
कोकण : जव्हार ३२, मोखेडा ४२.६, विक्रमगड ५०.५, कर्जत ४३.६, खालापूर ४९, महाड ६९, माथेरान ११६, म्हसळा ३५, पनवेल ५९.४, पेण ४५, पोलादपूर ६६, श्रीवर्धन ५४, सुधागड पाली ८०, चिपळूण ४६, दापोली ४३, गुहागर ५५, खेड ५५, मंडणगड ८९, राजापूर ४७, संगमेश्‍वर ३२, देवगड ३८, दोडामार्ग ९५, कणकवली ६५, कुडाळ ६०, मालवण ४५, सावंतवाडी १००, वैभववाडी ८०, वेंगुर्ला ४८.२, शहापूर ३४, उल्हासनगर ३४. 

मध्य महाराष्ट्र : आजरा ४६, चंदगड ८७, गडहिंग्लज ३४, गगनबावडा ११२, गारगोटी ४८, हातकणंगले ३४, पन्हाळा ४८, राधानगरी ६४, शाहूवाडी ५३, हर्सूल ५१.४, त्र्यंबकेश्‍वर ६१, लोणावळा कृषी ८६.१, शिरूर ३०, वडगाव मावळ ३६, महाबळेश्‍वर ८९. 


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...