agriculture news in Marathi rain weak in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.

पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. शनिवारी (ता.२४) राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली. काही भागांतील पूरस्थिती आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे वित्तहानी व जीवितहानी झालेले नुकसान समोर येऊ लागले आहे. प्रशासनाकडून पाहणी केली जात असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे. 

गेल्या आठवड्यापासून दक्षिण कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडला. पूर्व विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे दिसून आले. उत्तर कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडलेल्या पालघर, ठाणे, नाशिक, नगर, पुणे, जळगाव, धुळे जिल्ह्यांच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांत पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत पावसाने सर्वाधिक ओढ दिली असून, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते. 

कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला. पालघर, नाशिक, नगर, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आठवड्यातील सरासरीच्या तुलनेत उणे ७४ टक्के म्हणजेच अवघा २६ टक्के, भंडारा जिल्ह्यात उणे ६२ टक्के म्हणजेच ३८ टक्के, तर नागपूरमध्ये उणे ६० टक्के म्हणजे अवघा ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

पूरपरिस्थिती कायम 
कोकणातील डोलवहालमधील कुंडलिका, नागोठणेमधील अंबा, लोहणामधील पाताळगंगा, कर्जतमधील उल्हास, पनवेलमधील गाढी, मालवणमधील सूर्या (वैतरणा खोरे) खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वशिष्टी नद्यांना अजूनही पूर कायम आहे. महाड शहरालगत असलेल्या सावित्री नदीची धोकादायक पातळी अजूनही कायम आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा, सांगलीतील कृष्णा या नद्यांची पूरपरिस्थिती अजूनही कायम आहे. पुणे जिल्ह्यातील मुठा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

पिकांच्या नुकसानीत वाढ 
कोकणात शेकडो हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी फळबांगाचेही नुकसान झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत प्रामुख्याने ऊस, भाजीपाला, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांना फटका बसला. मराठवाड्यातही नांदेड, परभणी, हिंगोली भागांत कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले. विदर्भातील अकोला, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया भागांत कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आणि धान पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला 
कोयना ५२५५९, धोम १००४२, कण्हेर १०१३५, वारणावती १९७५०, कासारी १२९८, धोमबलकडवी ३४५४, उरमोडी ५४३४, तारळी ९८६३, खडकवासला १८,४९९, वीर २२३०५, कळमोडी ३२८४, आंध्रा ३३८०, वडीवळे ६२९४, वडज ५०५, गोसी खुर्द २६७९, हतनूर २४२१. 

शनिवारी (ता.२४) सकाळपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : 
तारळी ३५९, महाबळेश्‍वर २८७, वाराणावती २८५, धोमबलकवडी २४३, नीरा देवघर २५५, तुळशी २२२, नवजा २०७, धोम १७३, कण्हेर १५३, दूधगंगा १५९, पाटगाव १४५, ऊरमोडी १८२, टेमघर १९०, वरसगाव १८८, पानशेत १९३, खडकवासला ५८, पवना १२०, मुळशी २०१, कळमोडी १२४, वडीवळे १८७, गुंजवणी १७३, कासारी ८९, कोयना ८२, भामा आसखेड ८१, आंध्रा ९६, कासारसाई ७०, भाटघर ९२, वीर २५, नाझरे १६, पिंपळगावे जोगे ३८, चासकमान ३४, माणिकडोह २३, डिंभे ३२.  


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...