राज्यात पावसाचा जोर ओसरला 

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही भागांत अधूनमधून जोरदार तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
cotton damage
cotton damage

पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही भागांत अधूनमधून जोरदार तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सांताक्रुज येथे १०८.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकणात पावसाचा जोर ओसरल्यामुळे गंभीर पूरस्थितीचा धोका टळला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे शेती कामांना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अनेक ठिकाणी सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू होता. सलग तीन दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान तीन दिवसांनंतर बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. भातशेतीमध्ये शिरलेले  पाणी देखील ओसरायला सुरुवात झाली आहे. नदीनाल्यांच्या पाणीपातळीत सुध्दा घट झाली आहे. या जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला आहे. काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत तर काही तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, नगर, खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत तुरळक पाऊस झाला. जळगाव व धुळ्यात सर्वत्र मध्यम स्वरूपात पाऊस झाला. दुपारी जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, धुळे, शिंदखेडा भागात तासभर मध्यम पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धडगाव भागात काही मंडळात जोरदार पाऊस झाला. रात्रीदेखील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १३१ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, काही ठिकाणी होत असलेल्या पावसाने शेतीकामे ठप्प आहेत. 

मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली या सहा जिल्ह्यांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसाची उसंतच पाहायला मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता तर जालना जिल्ह्यातील काही मंडळात मध्यम ते दमदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ मंडळ वगळता अन्य मंडळात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील मंडळामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विदर्भातील बुलडाणा व पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम जिल्ह्यात ढगाळ हवामानासह तुरळक सरी पडल्या. तर अनेक भागात पावसाच्या उघडिपीमुळे शेतीकामांना चांगलाच वेग आला होता.  गुरूवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)  कोकण : मुंबई शहर : कुलाबा ५०.४, वसई ६९, अलिबाग ३१.२, महाड ४३, माणगाव ३३, माथेरान ८४.८, मुरूड ५०, पनवेल ६०.८, पेण ३९, रोहा ४४, श्रीवर्धन ३७, उरण ८०, चिपळूण ३८, सावंतवाडी ४९, अंबरनाथ ३७, कल्याण ५५, ठाणे १००.  मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ४१, पन्हाळा ४५, येवला ५१, महाबळेश्वर ४०.३.  मराठवाडा : जाफ्राबाद २३, जालना २२, विदर्भ : मेहकर २१.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com