agriculture news in Marathi rain weaken in state Maharashtra | Agrowon

पाऊस ओसरला; शेतीकामांत अडथळे 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

गेल्या दोन दिवसांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना निर्माण झालेली पुराची स्थिती शनिवारी (ता.१७) काहीशी ओसरली आहे. 

पुणे ः गेल्या दोन दिवसांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना निर्माण झालेली पुराची स्थिती शनिवारी (ता.१७) काहीशी ओसरली आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात घरे आणि शेतीचे नुकसान मात्र वाढले आहे. मराठवाडा व विदर्भात अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस सोंगणी व मळणीच्या कामात अडथळे तयार होत असल्याने कामे ठप्प आहेत. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. शेतकऱ्यांनी भातकापणीला पुन्हा सुरवात केली आहे. मात्र, नुकसान झालेल्या भातपिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. चार-पाच दिवसांच्या संततधारेनंतर शनिवारी (ता.१७) सकाळपासून पावसाने उघडीप दिली. काही शेतकऱ्यांनी भात कापणीसोबत 
झोडणीचे काम सुरू केले आहे. पाऊस पडेल अशी भीती अजूनही आहे. 

मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस 
मध्य महाराष्ट्रात गुरूवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारीही पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली होती. काही प्रमाणात ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या कमी झालेल्या सरीमुळे शेतकरीही शेतीकामांसाठी बाहेर पडले होते. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी बुधवारी झालेल्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात सोयाबीन, भात, कांदा, बाजरी, भूईमूग, ज्वारी, फुलपीके, चारा पीके, मका, तृणधान्ये, भाजीपाला, डाळीब, द्राक्षे या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यात अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती. नगरमध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाभरात साधारण २१६ गावांतील ६३ हजार शेतकऱ्यांच्या ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

सोलापूरात पावसामुळे जिल्ह्यातील भीमा, नीरा, सीना, भोगावती, बोरी या प्रमुख नद्यांच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पूरस्थिती आहे. पात्र सोडून या नद्या वाहू लागल्याने शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपूर, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांना पाऊस आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. 

मराठवाडा, विदर्भात कमी जोर 
मराठवाडा व विदर्भात पाऊस कमी झाला आहे. अधून-मधून येत असलेल्या पावसामुळे आता सोयाबीन सोंगणी व मळणीच्या कामात अडथळे तयार होत आहेत. अकोला जिल्ह्यात बाळापूर, तेल्हारा तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे. सोयाबीनची झडती यंदा दरवर्षीच्या तुलनेने कमी आहे. 

शनिवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस (मिलिमीटर) स्त्रोतः हवामान विभाग 
कोकण : महाड ११, देवगड १७, मालवण २१. 
मध्य महाराष्ट्र : मुल्हेर १०, वडगाव मावळ ११.२. 
विदर्भ ः बाळापूर १६.३, तेल्हारा १२.३, तिवसा ११.३, बल्लारपूर १४, सावळी १२.१, वरोरा ११.४, अरमोरी ११.९, धानोरा १५.१, गडचिरोली ७.४, नागपूर २०.७, सेलू १२.२, मालेगाव १९.३. 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...