पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस 

‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नगर जिल्ह्यांतही जाणवला. वादळी वाऱ्यासह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.
damage
damage

पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नगर जिल्ह्यांतही जाणवला. वादळी वाऱ्यासह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे फळबागांना फटका बसला, तर शेडनेटचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील गावांना बसला. शनिवारी (ता. १५) रात्रीसह रविवारी (ता.१६) सायंकाळी उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव शिरूरसह मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतील डोंगराळ भागाला बसला. रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. या वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची कौले, पत्रे उडण्याच्या घटना घडल्या. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. 

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरातील भोरगिरी गावातील वाड्या वस्त्यांवरील सुमारे ७० घरे आणि अंगणवाडी इमारतीचे पत्रे आणि कौले उडाल्याने नुकसान झाले आहे. तर चाकण (ता. खेड) परिसरात वाऱ्याचा तडाख्यामुळे घरावरील, शेडवरील पत्रेही वाऱ्याने उडत होते.शेतातील बाजरीचे पीक उन्मळून जमिनीवर कोसळले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने जनावरांच्या गोठ्यावरील गवताच्या छपऱ्या उडून गेल्या. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही झाडे पडली. वाऱ्याच्या अधिक वेगामुळे नागरिक, शेतकरी यांनी चिंताग्रस्त झाले होते. 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात तौत्की चक्रीवादळाचा हाय अलर्ट दिला होता. सर्व ग्रामसेवक आणि तलाठी यांना त्यांच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील कोव्हिड सेंटरवर देखील विशेष दक्षता घेतली जात होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com