Agriculture news in marathi; Rain to the west; rainfall in dule | Agrowon

खानदेशात पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

जळगाव  ः गणरायाच्या आगमनासोबत खानदेशात धुळे, जळगाव जिल्ह्यांतील आवर्षणप्रवण भागात बऱ्यापैकी पाऊसही झाला आहे. कापूस, ज्वारी आदी पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. परंतु मूग काढणीवर परिणाम होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगाव  ः गणरायाच्या आगमनासोबत खानदेशात धुळे, जळगाव जिल्ह्यांतील आवर्षणप्रवण भागात बऱ्यापैकी पाऊसही झाला आहे. कापूस, ज्वारी आदी पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. परंतु मूग काढणीवर परिणाम होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

गिरणा, तापी, पांझराकाठच्या काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती उत्तम होती. परंतु मुरमाड, हलक्‍या जमिनीच्या भागात कापूस, ज्वारी, उडीद, बाजरी आदी पिकांना पावसाची नितांत गरज होती. मागील आठवड्यात खानदेशातील आवर्षणप्रवण असलेल्या चाळीसगाव, पारोळा, पाचोरा, बोदवड, जामनेर, धुळे, शिंदखेडा या भागात जोरदार पाऊस झाला होता. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात रविवारी (ता. १) व सोमवारी (ता. २) झाला आहे. 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात मागील सात-आठ दिवसांपासून अधूनमधून जोरदार पाऊस येत आहे. सुमारे १०४ टक्‍क्‍यांवर पाऊस या तालुक्‍यात झाला आहे. तर धुळे, शिंदखेड्यातही अनुक्रमे सुमारे ८७ व ८५ टक्के पाऊस झाला आहे. शिरपुरातही पावसाची टक्केवारी ९० पर्यंत पोचण्याची स्थिती आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा, अनेर नदीला प्रवाही पाणी कायम आहे. पूरस्थिती कुठेही नाही. 

जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल या भागात मागील दोन-तीन दिवस बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या भागातील हिवरा, बहुळा, बोरी प्रकल्पाचा साठा वाढला आहे. शिवाय गिरणा नदीलाही प्रवाही पाणी आले आहे. वाघूर नदीमध्येही बऱ्यापैकी प्रवाही पाणी आहे. तर तापी, गूळ, मोर, सुकी, भोकरी या नद्यांनाही मागील १०-१२ दिवसांपासून प्रवाही पाणी कायम आहे. 

सध्या मूग काढणीवर आहे. परंतु वाफसा स्थिती व वातावरण अनुकूल नसल्याने काढणी ठप्प आहे. काळ्या कसदार जमिनीत मूग पिकाचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. नुकसान टाळण्यासाठी प्रतिकूल स्थितीतही शहादा, चोपडा, शिरपूर, यावल, जळगावच्या तापीकाठी मूग काढणी सुरू झाल्याचे सांगण्यात आले. 
 


इतर ताज्या घडामोडी
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...
पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...
नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...