पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस
पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, तर बारामती, दाैंड, इंदापूरसह पूर्व भागातील तालुक्यांमध्ये पावसाची दडी कायम आहे.

मावळ, मुळशी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. मुळशीतील मुठे येथे सर्वाधिक ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खेड, अांबेगाव तालुक्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांच्या पूर्व भागात मात्र पावसाचा जोर कमी होता. तर शिरूर, पुरंदर तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांत मात्र दखलपात्र पाऊस पडला नाही.

जिल्ह्यातील प्रमुख धरणे पश्‍चिम भागात असल्याने पाणलोटातही पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ८१ मिमी, वरसगाव ३५, पानशेत ३९, पवना ३८, मुळशी ५६, वडीवळे धरणक्षेत्रात ८७ मिमी पाऊस झाला. इतरही धरणक्षेत्रात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. सोमवारी खडकवासला धरणातून सहा हजार क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते. तर पानशेत, पवना, मुळशी, चासकमान, वीर, चिल्हेवाडी धरणांमधून पाण्याचा मोठा, तर इतर धरणांतून कमी अधिक विसर्ग सुरू होता.

जिल्ह्यात सोमवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : पौड ३१, घोटावडे ३२, माले ५६, मुठे ८१, पिरंगुट ३०, भोलावडे ४२, काले ६९, लोणावळा ६४, वेल्हा ४३, पानशेत ३९, राजूर ४७, आपटाळे ३५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com