साताऱ्याच्या पश्चिम भागात पाऊस

साताऱ्याच्या पश्चिम भागात पाऊस
साताऱ्याच्या पश्चिम भागात पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील पेरण्या झालेल्या पिकांना फायदा होणार आहे.

गेले तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत झाली. शेतात घात येईल तसतशी पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला होता. मजूरटंचाईमुळे तणनाशकांचा वापर अधिक केला जात आहे. हलक्या शेतात पिके सुकायला लागली असतानाच मंगळवारी (ता. ३) रात्रीपासून पश्चिम भागात अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यामुळे पिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, जावली तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. 

सातारा, कराड, वाई, खंडाळा, कोरेगाव तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. बुधवारी (ता.४) सकाळी आठपर्यंत सरासरी ११.०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये महाबळेश्‍वर तालुक्यात सर्वाधिक १२७.०३, जावली १७.८०, पाटण १३.९१, सातारा ९.२०, वाई ६.७१, कऱ्हाड ३.८, खंडाळा ४.५५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाची गरज आहे. मात्र, याच तालुक्यात पाऊस पडत नसल्यामुळे टंचाई परिस्थिती कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com