agriculture news in Marathi rain will be good this year Maharashtra | Agrowon

सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा पाऊसमान राहणार चांगला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या योगदंडास, मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा विधी गुरुवारी (ता.१४) झाला. 

सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या योगदंडास, मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा विधी गुरुवारी (ता.१४) झाला. तसेच रात्री होमप्रदीपनासह भाकणूकही झाली. यंदा पाऊसमान चांगलं राहणार असल्याची भाकणूक या वेळी करण्यात आली.

कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या दोन्ही नंदिध्वजांचे मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर सजवलेल्या बग्गीतून हिरेहब्बू योगदंड घेऊन मंदिराकडे निघाले. दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे बग्गी, पालखीरथ मंदिर परिसरातील संमती कट्टा येथे आला. सुरुवातीला श्रींची मूर्ती व योगदंडास करीमुटगी लावून तलावात स्नान घालण्यात आले. सकाळी हळद काढल्यानंतर ६८ लिंगांपैकी मंदिर परिसरातील पहिल्या अमृतलिंगाची विधिवत पूजा झाली. 

अशी झाली भाकणूक
सिद्धरामेश्‍वर यात्रेतील भाकणुकीलाही विशेष महत्त्व असते, यासाठी दिवसभर गाईच्या वासराला उपाशी ठेवले जाते. रात्री त्याच्यासमोर विविध वस्तू ठेवून भाकणूक केली जाते. वासराच्या खाण्यापिण्यावरून ही भाकणूक होते. यामध्ये वासरासमोर गूळ, खोबरे, कडधान्य, कडबा, गाजर आणि पाणी, विडा ठेवला. आरतीनंतर वासराला टेंभा दाखविला. दिवसभर उपाशी वासरू अस्वस्थपणे समोर दिसलेल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करीत राहिले. त्या आधारावर २०२१ वर्ष हे काहीसे अस्थिर मानसिकतेचे असेल. काही वस्तूंची टंचाई जाणवेल, पण पाऊस चांगला असेल, अशी भाकणूक या वेळी शिवानंद हिरेहब्बू यांनी केली.


इतर अॅग्रो विशेष
दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
किमान तापमानात वाढ पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय...
देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के...नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही...
‘पीएम-किसान’चे काम करण्यास महसूलचा नकार अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना...
‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइनमुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढनगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी...
तीन लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी...मुंबई : नवीन कृषिपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून...
इथेनॉल उत्पादनाचे वेळापत्रक कोलमडले पुणे : तेल कंपन्यांची साठवणक्षमता अपुरी पडत...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजनवर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे...
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...