agriculture news in Marathi rain will be good this year Maharashtra | Page 3 ||| Agrowon

सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा पाऊसमान राहणार चांगला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या योगदंडास, मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा विधी गुरुवारी (ता.१४) झाला. 

सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या योगदंडास, मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा विधी गुरुवारी (ता.१४) झाला. तसेच रात्री होमप्रदीपनासह भाकणूकही झाली. यंदा पाऊसमान चांगलं राहणार असल्याची भाकणूक या वेळी करण्यात आली.

कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या दोन्ही नंदिध्वजांचे मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर सजवलेल्या बग्गीतून हिरेहब्बू योगदंड घेऊन मंदिराकडे निघाले. दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे बग्गी, पालखीरथ मंदिर परिसरातील संमती कट्टा येथे आला. सुरुवातीला श्रींची मूर्ती व योगदंडास करीमुटगी लावून तलावात स्नान घालण्यात आले. सकाळी हळद काढल्यानंतर ६८ लिंगांपैकी मंदिर परिसरातील पहिल्या अमृतलिंगाची विधिवत पूजा झाली. 

अशी झाली भाकणूक
सिद्धरामेश्‍वर यात्रेतील भाकणुकीलाही विशेष महत्त्व असते, यासाठी दिवसभर गाईच्या वासराला उपाशी ठेवले जाते. रात्री त्याच्यासमोर विविध वस्तू ठेवून भाकणूक केली जाते. वासराच्या खाण्यापिण्यावरून ही भाकणूक होते. यामध्ये वासरासमोर गूळ, खोबरे, कडधान्य, कडबा, गाजर आणि पाणी, विडा ठेवला. आरतीनंतर वासराला टेंभा दाखविला. दिवसभर उपाशी वासरू अस्वस्थपणे समोर दिसलेल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करीत राहिले. त्या आधारावर २०२१ वर्ष हे काहीसे अस्थिर मानसिकतेचे असेल. काही वस्तूंची टंचाई जाणवेल, पण पाऊस चांगला असेल, अशी भाकणूक या वेळी शिवानंद हिरेहब्बू यांनी केली.


इतर अॅग्रो विशेष
आज रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत...मुंबई: मी हे निर्बंध आनंदाने लादत नाही आज...
शेतात आता काय राहीलच न्हाय !रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर)...
शंभर क्विंटल गवार विकायची कोठे? कापडणे, जि. धुळे : येथील भाजीपाला उत्पादक...
चिमण्यांच्या अस्तित्वासाठी ‘एक घास...सावनेर, जि. नागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे...
मृग बहर केळीखालील क्षेत्र स्थिर राहणार जळगाव ः खानदेशात गेले काही महिने केळीचे दर स्थिर...
कांदा बीजोत्पादन ५० टक्क्यांवर घटले अकोला ः दोन पैसे अधिक मिळावेत या उद्देशाने शेतकरी...
खरीप बियाण्यांचा पुरवठा आव्हानात्मक पुणे : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या साथीचा उद्रेक...
पूर्वमोसमीचा प्रभाव उद्यापासून कमी...पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागात...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
सृष्टीला आला नवबहार...! आज चैत्र पाडवा...रोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : चैत्र महिन्याच्या...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पूर्वमोसमी पावसाचा दुसऱ्या दिवशीही दणका पुणे : राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत आहे...
फळे, भाजीपाला थेट विक्रीला परवानगी द्या पुणे ः कोरोना विषाणूच्या फैलावाच्या दुसऱ्या लाटेत...
राज्यात तीन दिवस पूर्वमोसमी पावसाची...पुणे : राज्यातील अनेक भागात वातावरणात वेगाने बदल...
उसावर ‘चाबूक काणी’चा प्रादुर्भाव उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा व लोहारा...
नगर जिल्ह्यात कांद्याची यंदा विक्रमी...नगर : नगर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
सांगली जिल्ह्यातून १६ हजार टन...सांगली : गेल्या वर्षी द्राक्षावर नैसर्गिक...