नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
अॅग्रो विशेष
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणार
पुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी समुद्रावर पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारपासून (ता. १९) पश्चिम किनाऱ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानंतर जवळपास आठवडाभर तळकोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज (ता. १५) कोकणात काही ठिकाणी तर राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याचे संकेत असल्याने गुरुवारपासून (ता. १९) सोमवारपर्यंत (ता. २३) राज्यात मॉन्सूनचा पाऊस वाढू शकेल. यातच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. १५) या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, काही ठिकाणी पावसाच्या सरी येत आहेत. आज कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :कोकण : वसई ४६, भिरा ८५, कर्जत ८९, माथेरान १६४, मुरूड ६०, श्रीवर्धन ४७, सुधागडपाली ७२, तळा ४६, संगमेश्वर ५९, वेंगुर्ला ७४, अंबरनाथ ४०, कल्याण ४६, ठाणे ७५, उल्हासनगर ३८.
मध्य महाराष्ट्र : साक्री ३८, पाचोरा ३४, पारोळा ५१, राधानगरी २३, नंदुरबार ३६, इगतपुरी २८, सुरगाणा ८८, घोडेगाव २५, राजगुरुनगर २१, लोणावळा कृषी ७४, पौड ६२, वडगाव मावळ ३८, महाबळेश्वर ९१.
मराठवाडा : सोयगाव ४८, अहमदपूर २७.
विदर्भ : चिखलदरा ३६, धारणी ३७, गोंडपिंपरी २०, मूल २३, आहेरी २६, चामोर्शी २०, गडचिरोली २७.