agriculture news in Marathi rain will be less from Sunday Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात पावसाचा जोर रविवारपासून कमी होणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

दक्षिण गुजरातची किनारपट्टी व तेलंगणापर्यंत चक्रवाताची स्थिती असून ती मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या दरम्यान आहे.

पुणे ः दक्षिण गुजरातची किनारपट्टी व तेलंगणापर्यंत चक्रवाताची स्थिती असून ती मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या दरम्यान आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, रविवार (ता.२०) नंतर या भागातील पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.    

अरबी समुद्राचा ईशान्य भाग व दक्षिण गुजरातची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत असून समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर प्रदेशचा आग्नेय भाग व परिसर आणि राजस्थानच्या ईशान्य भाग व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.

बंगालच्या उपसागराच्या पश्चिमेमध्ये आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी आज (ता.१६) पावसाच्या मेघगर्नजेसह सरी पडतील. 

उद्यापासून (ता.१७) विदर्भात अनेक ठिकाणी उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


इतर बातम्या
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी...नाशिक : नाशिक व नगर जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र...
सोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी;...यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटल्याने...
वाशीम जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावीवाशीम ः जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वर्ग एक...
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
ठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा...मुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न? मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव...
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...