नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
अॅग्रो विशेष
कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत; सोमवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता.४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पोषक ठरल्याने राज्यात सोमवारपासून (ता.३) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.
पुणे : बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता.४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पोषक ठरल्याने राज्यात सोमवारपासून (ता.३) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज (ता.१) कोकणात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सून आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून आसामपर्यंत सक्रिय आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे मंगळवारपर्यंत (ता.४) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
शुक्रवारी (ता.३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीतील गुहागर येथे सर्वाधिक ११३ मिलिमीटर पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी पडल्या. आज (ता.१) कोकणातील, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात हलक्या ते जोरदार, तर मराठवाडा विदर्भात विजांसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) :
कोकण : कुलाबा ४५, माथेरान २०, चिपळूण ३४, दापोली २१, गुहागर ११३, राजापूर २५, रत्नागिरी ३९, देवगड ८४, कुडाळ २१, मालवण २०, रामेश्वर २७, सावंतवाडी ४७, वेंगुर्ला २३.
मध्य महाराष्ट्र : राहुरी २३, शेवगाव ३९, दिंडोरी २७, सटाना २०, सांगली २१, सेालापूर ५७.
मराठवाडा : औरंगाबाद २४, गंगापूर २२, फुलंब्री २९, चाकूर २६.
- 1 of 656
- ››