agriculture news in Marathi rain will be weak in state Maharashtra | Page 4 ||| Agrowon

सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. आज (ता. १९) आणि उद्या (ता. २०) कोकण व विदर्भाच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडतील.

पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. आज (ता. १९) आणि उद्या (ता. २०) कोकण व विदर्भाच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडतील. सोमवारपासून राज्यातील पावसाचा प्रभाव कमी होणार असून, विदर्भाच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बदलले आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून चांगलेच ऊन पडत आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. हवेत बऱ्यापैकी गारवा तयार झाल्याने मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. उन्हाळ्यात असह्य झालेला उकाडा आता कमी होऊ लागल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळच्या आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

पूर्व विदर्भात होत असलेल्या हलक्या पावसामुळे सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसची घट झाली. त्यामुळे कमाल तापमान २९ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही २० ते ३७ अंश सेल्सिअस, मराठवाड्यातही तापमान २९ ते ३५ अंश सेल्सिअस, तर कोकणात २९ ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
शनिवार ः
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 
रविवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ 
सोमवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ 
मंगळवार ः विदर्भ 

शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) २९.६ 
  • अलिबाग - ३१.७ 
  • रत्नागिरी - २९.४ 
  • डहाणू - ३१.९ 
  • पुणे - २७.८ 
  • कोल्हापूर - २६.६ 
  • महाबळेश्‍वर - २० 
  • मालेगाव -- ३७.४ 
  • नाशिक - ३०.३ 
  • सांगली - २६.२ 
  • सातारा - २४.२ 
  • सोलापूर - ३२.४ 
  • औरंगाबाद - ३२.६ 
  • परभणी -- २९.८ 
  • बीड -- ३५ 
  • अकोला - ३५.१ 
  • अमरावती - ३२.८ 
  • बुलडाणा - २९ 
  • ब्रह्मपुरी - ३५.७ 
  • चंद्रपूर - ३४ 
  • गोंदिया - ३५ 
  • नागपूर - ३५.६ 
  • वर्धा - ३५.८ 

इतर अॅग्रो विशेष
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
पंढरपुरात पूरस्थितीसोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या...
कृषी प्रवेशप्रक्रिया ‘सीईटी’कडेच पुणे ः कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी...
साडेतीन हजार कोटींसाठी साखर...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकविलेली...
‘अंतिम अरदास’मध्ये पुन्हा पाणावले डोळे...लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथील तिकोनिया येथे...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारीपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसादपुणे - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे...
हत्याकांडाचा ‘कडकडीत’ निषेधपुणे ः लखीमपूर खिरीमध्ये भाजपा मंत्रिपुत्राच्या...
कापसाचे दर राहतील ७००० रुपयांच्या पुढे...नागपूर ः जागतिक बाजारात १९९४ व २०११ नंतर...
राज्यात पावसाची उघडीप शक्यपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा...
कोल्हापूर, सांगली, कोकणात बंदला संमिश्र...कोल्हापूर : लखीमपूर येथील शेतकऱ्यांना...
मॉन्सून महाराष्ट्रातून परतण्यास प्रारंभपुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल...
ऊस वाहतूक नियमावली रद्द केल्याने नाराजीपुणे ः राज्यातील उसाची तोडणी व वाहतुकीच्या...
पीकविमा कामकाजात हलगर्जीपणा नाहीपुणे ः पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल...
ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा...पुणे ः ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास...