पावसाचा जोर कमी होणार 

कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
पावसाचा जोर कमी होणार 
पावसाचा जोर कमी होणार 

पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज (ता. २१) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. तर पुढील आठवड्यात (२५ जून ते १ जुलै) या काळात राज्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

कोकण आणि पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात गुरुवारपर्यंत (ता. २४) पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. यामुळे कोकणातील काही भागातील पाऊस कमी होऊ लागला आहे. आज राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, अधूनमधून ऊन पडणार असल्याची शक्यता आहे. यामुळे उकाड्यातही काही प्रमाणात वाढ होईल. रविवारी (ता. २०) सकाळच्या आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

राज्यातील पावसाचा प्रभाव कमी झाला असला, तरी सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. कोकणात कमाल तापमानात २८ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही १९ ते ३६ अंश सेल्सिअस, मराठवाड्यातही तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर कोकणात २९ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस  बुधवार ः भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया  गुरुवार ः भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया  रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३२ 
  • अलिबाग - ३२.८ 
  • रत्नागिरी - २९.४ 
  • डहाणू - ३२.३ 
  • पुणे - २९.६ 
  • जळगाव - ३६.४ 
  • कोल्हापूर - २५.१ 
  • महाबळेश्‍वर - १९.६ 
  • मालेगाव -- ३६.६ 
  • नाशिक - ३०.५ 
  • सांगली - २५ 
  • सातारा - २७.६ 
  • सोलापूर - ३२.४ 
  • औरंगाबाद - ३३.२ 
  • परभणी -- ३३.३ 
  • बीड -- ३२.८ 
  • अकोला - ३५ 
  • अमरावती - ३२.४ 
  • बुलडाणा - २९.२ 
  • ब्रह्मपुरी - ३३.२ 
  • चंद्रपूर - ३३.४ 
  • गोंदिया - ३०.४ 
  • नागपूर - ३३.१ 
  • वर्धा - ३२.५  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com