पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची शक्यता 

मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाची उघडीप राहील.
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची शक्यता 
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची शक्यता 

पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाची उघडीप राहील. कोकण, घाटमाथ्यावर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र, कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने कहर केला. शुक्रवारी (ता.२३) पुढील दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात २३ ते २९ जुलै या दरम्यान कोकण, विदर्भासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. 

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यातही ३० जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याने राज्यात सर्वदूर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावासाच्या सरी सुरूच राहणार असून, उर्वरित राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता आहे. 

पुढील दोन्ही आठवड्यांतील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केलाय. यात दोन्ही आठवड्यांत कमाल तापमान सरासरी ते सरासरीच्या कमी राहणार असून, पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक राहण्याचा अंदाज आहे. दोन्ही आठवड्यांत किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार असून, मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.  येथे होणार जोरदार पाऊस   रविवार ः ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.  सोमवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.  मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.  बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शनिवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २६.४ (-१.६) 
  • जळगाव - २९.६ (-२.७) 
  • कोल्हापूर - २३.३ (-३.५) 
  • महाबळेश्‍वर - २० (०.४१) 
  • मालेगाव - ३२.८ (१.९) 
  • नाशिक - २८.१ (-०.४) 
  • सांगली - २४.२ (-४.५) 
  • सातारा - २६.५ (-०.४) 
  • सोलापूर - २८.५ (-३.४) 
  • मुंबई (कुलाबा) - २८.२ (-१.७) 
  • अलिबाग - २८.४ (-१.८) 
  • रत्नागिरी - २७.९ (-१.०) 
  • डहाणू - ३०.७ (०.१) 
  • औरंगाबाद - २७.४ (-२.४) 
  • परभणी - २९ (-२.४) 
  • बीड- २६.५ (-३.०) 
  • अकोला - २७ (-४.७), 
  • अमरावती - २६.८ (-३.५) 
  • बुलढाणा - २७.६ (-०.३) 
  • ब्रम्हपुरी - २८.२ (-२.२) 
  • चंद्रपूर - २७.२ (-४.०) 
  • गोंदिया - ३१ (-०.२) 
  • नागपूर - २७.४ (-३.६) 
  • वर्धा - २७.५ (-३.२) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com