agriculture news in Marathi rain will be weak in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाची उघडीप राहील.

पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाची उघडीप राहील. कोकण, घाटमाथ्यावर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र, कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने कहर केला. शुक्रवारी (ता.२३) पुढील दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात २३ ते २९ जुलै या दरम्यान कोकण, विदर्भासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. 

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यातही ३० जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याने राज्यात सर्वदूर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावासाच्या सरी सुरूच राहणार असून, उर्वरित राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता आहे. 

पुढील दोन्ही आठवड्यांतील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केलाय. यात दोन्ही आठवड्यांत कमाल तापमान सरासरी ते सरासरीच्या कमी राहणार असून, पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक राहण्याचा अंदाज आहे. दोन्ही आठवड्यांत किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार असून, मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस  
रविवार ः
ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर. 
सोमवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 
मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर. 
बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शनिवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे - २६.४ (-१.६) 
 • जळगाव - २९.६ (-२.७) 
 • कोल्हापूर - २३.३ (-३.५) 
 • महाबळेश्‍वर - २० (०.४१) 
 • मालेगाव - ३२.८ (१.९) 
 • नाशिक - २८.१ (-०.४) 
 • सांगली - २४.२ (-४.५) 
 • सातारा - २६.५ (-०.४) 
 • सोलापूर - २८.५ (-३.४) 
 • मुंबई (कुलाबा) - २८.२ (-१.७) 
 • अलिबाग - २८.४ (-१.८) 
 • रत्नागिरी - २७.९ (-१.०) 
 • डहाणू - ३०.७ (०.१) 
 • औरंगाबाद - २७.४ (-२.४) 
 • परभणी - २९ (-२.४) 
 • बीड- २६.५ (-३.०) 
 • अकोला - २७ (-४.७), 
 • अमरावती - २६.८ (-३.५) 
 • बुलढाणा - २७.६ (-०.३) 
 • ब्रम्हपुरी - २८.२ (-२.२) 
 • चंद्रपूर - २७.२ (-४.०) 
 • गोंदिया - ३१ (-०.२) 
 • नागपूर - २७.४ (-३.६) 
 • वर्धा - २७.५ (-३.२) 

इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...