agriculture news in Marathi rain will increased in Kokan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकणात पावसाचा जोर वाढणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे आज (ता.७) पावसाचा जोर कमी कमी होऊन उद्यापासून (ता.८) पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे आज (ता.७) पावसाचा जोर कमी कमी होऊन उद्यापासून (ता.८) पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच कोकणच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशाचा परिसर, जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. 

येत्या चार ते पाच दिवस कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावरही अतिवृष्टी होणार असून मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यात बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पूर्व भागात 
पावसाचा जोर कमी राहणार आहे. मराठवाड्याच्या बहुतांशी भागात व विदर्भातील पश्चिम भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. सोमवारी (ता.१०) कोकण, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...