कोकण, मध्य महाराष्ट्, विदर्भात पावसाचा जोर वाढणार

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे  ः कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्याने अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील पश्‍चिम भागात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढणार असून, मराठवाड्यात पावसाच्या अधूनमधून सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. बंगालचा उपसागर ते उत्तर भारतातील आग्रा, हिस्सार, गंगासागर, सुलतानपूर, पटना, कृष्णनगर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच कर्नाटक परिसर आणि रायलसीमा परिसर, तर गुजरातच्या दक्षिण परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी वाढलेल्या उकाड्यात पुन्हा घट झाली असून, हवामान पुन्हा ढगाळ झाले आहे. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हवामान ढगाळ असून, अनेक ठिकाणी ऊन सावल्याचा खेळ सुरू होता.  गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत - हवामान विभाग) कोकण ः भिवडी २००, पालघर कृषी १९०, वाडा, पेण, वसई १८०, उल्हासनगर, पनवेल १७०, कल्याण, अंबरनाथ, शहापूर १५०, विक्रमगड १४०, तला, अलिबाग, तलासरी १३०, जव्हार, ठाणे, म्हसळा ११०, मानगाव, गुहागर, रोहा, मंडणगड १००, लांजा, खेड, माथेरान, मुरबाड ९०, देवगड, भिरा, श्रीवर्धन, मोखाडा, संगमेश्‍वर देवरूख, रत्नागिरी, कनकवली ८०, कर्जत, मालवण, पोलादपूर, मुल्दे, महाड, खालापूर ७०, सावंतवाडी, उरण, चिपळूण ६०, कुडाळ, मुरूड, कुलाबा, फोडा, हहाणू, राजापूर, सुधागड ५०, रामेश्‍वर, हर्णे, वैभववाडी, सांताक्रूझ, दोडामार्ग ४०,  मध्य महाराष्ट्र ः सुरगाणा १००, इगतपुरी ९०, ओझरखेडा ८०, नवापूर, लोणावळा, हरसूल, महाबळेश्‍वर ७०, अंमळनेर ६०, गगनबावडा, त्र्यंबकेश्‍वर, सावंतवाडी ५०, पेठ, वेल्हे ४०, धडगाव, पौड, धरणगाव ३०, राधानगरी, अक्कलकुवा, नंदुरबार, एरंडोल, राहुरी, पन्हाळा, चोपडा, गारगोटी २० मराठवाडा ः अर्धापूर, वैजापूर २०, माजलगाव, उस्मानाबाद, पाथरी १० घाटमाथा ः ताम्हिणी १७०, धारावी ११०, खोपोली ९०, दावडी ७०, शिरगाव, वळवण, अंबोणे, कोयना (नवजा) ६०, खांड ५००, भिवपुरी ३०, ठाकूरवाडी, वानगाव २० विदर्भ ः दर्यापूर ३०, बार्शीटाकळी, अकोला, हिंगणघाट, पातूर, खामगाव २०, मूर्तिजापूर, बाळापूर, वरोरा, अंजनगाव, चांदूर बाजार, अकोट, भद्रावती, परतवाडा १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com