agriculture news in Marathi rain will increased in state Maharashtra | Agrowon

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

 बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ हवामान राहणार आहे.

पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ हवामान राहणार आहे. तर, पुढील चार ते पाच दिवस कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर गुजरात या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. याशिवाय उत्तर भारतात मॉन्सनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, पिलानी ते मेघालयपर्यंत कायम आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती असून राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रविवारी (ता.२) सकाळी आठवाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ५४.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कोकणातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान असून सावंतवाडी, मालवण, दापोली, राजापूर, हर्णे, कणकवली या भागात मध्यम स्वरूपाचा तर अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला. मध्य महाराष्ट्रातही घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे ४३ मिलिमीटर पाऊस पडला असून दुष्काळी असलेल्या बीडमध्ये ४० मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

रविवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासात झालेला पाऊस (मिलिमीटर) 
कोकण : भिरा १६, दापोली ३८, गुहागर १६, हर्णे २३.८, खेड २०, लांजा १५, मंडणगड १५, राजापूर २४, रत्नागिरी १३.१, देवगड २२, दोडामार्ग २४, कणकवली २६, कुडाळ १६, मालवण २५, सावंतवाडी ३२, वैभववाडी १६, वेंगुर्ला ५४.४.
मध्य महाराष्ट्र ः  गगनबावडा २६, इगतपुरी १९, मुल्हेर १२, सुरगाणा १५.३, कवठेमहांकाळ १७.२, महाबळेश्वर २५.६.
मराठवाडा ः औरंगाबाद १३.२, बीड ४०, जाफ्राबाद २३, हादगाव २०, लोहा ४३, मुदखेड १५, नांदेड ११, उमरी १६, उमरगा ३०, पालम २५, पाथरी ९.
विदर्भ : लाखंदूर ३८.२, पवनी १८.६, साकोळी १९.८, ब्रह्मपुरी २१, चिमूर २९.१, गोंडपिंपरी १०, धानोरा २३.९, एटापल्ली, आमगाव २१.१, सडक अर्जुनी ९.५, भिवापूर १५.८, मौदा ८.४, नागपूर २३, सावनेर २१.८, उमरेर ९.७, उमेरखेड ११.३.


इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...