agriculture news in Marathi rain will increased in state Maharashtra | Agrowon

पावसाचा जोर वाढणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

विदर्भ ते पूर्व उत्तर प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच महाराष्ट्राची उत्तर किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. 

पुणे ः विदर्भ ते पूर्व उत्तर प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच महाराष्ट्राची उत्तर किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, सोमवारपासून (ता.१४) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्राचा पूर्वमध्य परिसर व कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्रवाताची स्थिती आहे. तर बंगालचा उपसागराच्या पश्चिमेमध्ये आणि आंध्रप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता.१३) तयार होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगालच्या परिसरात समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही भागात अधूनमधून ढगाळ हवामान तयार होत आहे.

सोमवारपासून (ता.१४) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील. तर अनेक ठिकाणी सकाळपासून कडक ऊन पडेल. पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...