पावसाचा प्रभाव वाढणार 

कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव वाढणार आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव वाढणार आहे. कोकण, विदर्भातही काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  गेल्या दोन दिवसांपासून कमी झालेला पारा पुन्हा वाढला आहे. काही भागांत ढगाळ वातावरण असले, तरी उन्हाच्या चटक्यामुळे उकाडा वाढला आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्यावर गेला आहे. बहुतांशी भागात पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात चढउतार राहणार असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्‍वर येथे किमान १७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.  उत्तर कर्नाटक व परिसर ते दक्षिण केरळ व किनारपट्टीदरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीय वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच कोमोरिन परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर- वायव्य भारतात पंजाब ते आसाम, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार आणि हिमालयाचा भाग, पश्‍चिम बंगाल परिसरात कमी दाबाच्या पट्ट्याची द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे उत्तर भारतासह राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

राज्यात या जिल्ह्यामध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस :  शुक्रवार ः संपूर्ण महाराष्ट्र  शनिवार ः संपूर्ण महाराष्ट्र  रविवार ः संपूर्ण महाराष्ट्र  सोमवार ः संपूर्ण महाराष्ट्र  गुरुवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.२ 
  • अलिबाग ३२.८ 
  • रत्नागिरी ३४.२ 
  • डहाणू ३५.४ 
  • पुणे ३८.३ 
  • जळगाव ४२.२ 
  • कोल्हापूर ३६.५ 
  • महाबळेश्‍वर ३०.१ 
  • मालेगाव ४१.४ 
  • नाशिक ३७.७ 
  • सांगली ३७.३ 
  • सातारा ३७.४ 
  • सोलापूर ३९.८ 
  • औरंगाबाद ३९.८ 
  • परभणी ४०.८ 
  • नांदेड ३९ 
  • अकोला ४२.८ 
  • अमरावती ४१.४ 
  • बुलडाणा ३९.२ 
  • ब्रम्हपुरी ३९.८ 
  • चंद्रपूर ४१.६ 
  • गोंदिया ४०.८ 
  • नागपूर ४१.९ 
  • वाशिम ४०.६ 
  • वर्धा ४१.८ 
  • यवतमाळ ४२.७ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com