राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोकण व अरबी समुद्राच्या पूर्वमध्ये भागात व महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोकण व अरबी समुद्राच्या पूर्वमध्ये भागात व महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. सोमवारपासून (ता.१०) पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस पडेल. तर पूर्व मध्य महाराष्ट्र, खानदेश व मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे तीन ऑगस्टपासून कोकण, मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसापासून त्याची तीव्रता कमी झाल्याने पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान मध्य प्रदेश आणि गुजरात या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र होते. तर कच्छ व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती होती. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर होती. तसेच मॉन्सूनचा पट्टा नलिया, कोटा, मिर्झापूर, दाल्तोगंज, बंकुरा, दिघा ते बंगालचा उपसागर या दरम्यान आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. आज (ता.८) आणि उद्या कोकण, घाटमाथ्यावर जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावरही अतिवृष्टी होणार असून मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यात बहुतांशी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पूर्व भागात उघडीप राहणार असून मराठवाड्याच्या बहुतांशी भागात व विदर्भातील अनेक भागात हवामान अंशतः हवामान ढगाळ राहील. अधूनमधून ऊन पडण्याची शक्यता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com