पावसाचा जोर आजपासून वाढणार

उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
पावसाचा जोर आजपासून वाढणार
पावसाचा जोर आजपासून वाढणार

पुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आजपासून (ता.४) ते शनिवार (ता.७) पर्यंत कोकण, घाटमाथ्यावर, विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.       पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर उत्तर भागात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे. तसेच उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा गंगासागर ते बंगाल उपसागराच्या ईशान्य भागापर्यंत आहे. याशिवाय राजस्थानच्या नैर् ऋत्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई परिसरात दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.   राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ हवामानाची स्थिती आहे. मराठवाडा व विदर्भातही ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस पडला. सोमवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूर येथे ११७.१ मिलिमीटर पाऊस पडला. तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरातील गगनबावडा येथे ८९ मिलिमीटर पाऊस पडला असून धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली भागातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडला.  

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) कोकण : अलिबाग १०.४, महाड १०, म्हसळा १५, मुरूड ३५, पोलादपूर २४, चिपळूण ४३, दापोली ३५, गुहागर ४५, खेड ४५, लांजा ५१, मंडणगड ४०, राजापूर ३२, रत्नागिरी ३६.७, संगमेश्वर ७७, देवगड ५२, दोडामार्ग ५३, कणकवली ४६, कुडाळ ४५, मालवण ६९, रामेश्वर ४०.४, सावंतवाडी ६२, वैभववाडी ४४, वेंगुर्ला ३४.४. मध्य महाराष्ट्र ः भुसावळ २९.६, जामनेर २५, गगणबावडा ८९, महाबळेश्वर २१.४, अक्कलकोट १२. मराठवाडा : गंगापूर ४७, कन्नड २२, सोयगाव ३७, भोकर ३०, विदर्भ :   चांदूर रेल्वे २८.२, दर्यापूर ३०.८, धामणगाव रेल्वे ३७.५, वरूड २८.८, पवनी  ५१.२, भद्रावती ३२.८, जेवती ४७.९, कोर्पणा ५१, मूल २८.६, अहेरी ४३.१, अरमोरी ३०.५, भामरागड ४२.३, एटापल्ली २९.९, गडचिरोली ३९.६, मुलचेरा ४३.२, हिंगणा ४६.१, कळमेश्वर ३२.२, कामठी ४३.८, कुही ६३.६, नागपूर ११७.१, नरखेडा २७.५, पारशिवणी ४३.५, सावनेर ५०.१, उमरेड ३५.१, देवळी ३१.६, सेलू ३९.४, वर्धा ४५.३, कळंब ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com