agriculture news in Marathi rain will increased in state from today Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पावसाचा जोर आजपासून वाढणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 

पुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आजपासून (ता.४) ते शनिवार (ता.७) पर्यंत कोकण, घाटमाथ्यावर, विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.      

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर उत्तर भागात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे. तसेच उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा गंगासागर ते बंगाल उपसागराच्या ईशान्य भागापर्यंत आहे. याशिवाय राजस्थानच्या नैर् ऋत्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई परिसरात दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.  

राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ हवामानाची स्थिती आहे. मराठवाडा व विदर्भातही ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस पडला. सोमवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूर येथे ११७.१ मिलिमीटर पाऊस पडला. तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरातील गगनबावडा येथे ८९ मिलिमीटर पाऊस पडला असून धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली भागातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडला.  

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
कोकण : अलिबाग १०.४, महाड १०, म्हसळा १५, मुरूड ३५, पोलादपूर २४, चिपळूण ४३, दापोली ३५, गुहागर ४५, खेड ४५, लांजा ५१, मंडणगड ४०, राजापूर ३२, रत्नागिरी ३६.७, संगमेश्वर ७७, देवगड ५२, दोडामार्ग ५३, कणकवली ४६, कुडाळ ४५, मालवण ६९, रामेश्वर ४०.४, सावंतवाडी ६२, वैभववाडी ४४, वेंगुर्ला ३४.४.
मध्य महाराष्ट्र ः भुसावळ २९.६, जामनेर २५, गगणबावडा ८९, महाबळेश्वर २१.४, अक्कलकोट १२.
मराठवाडा : गंगापूर ४७, कन्नड २२, सोयगाव ३७, भोकर ३०,
विदर्भ :  चांदूर रेल्वे २८.२, दर्यापूर ३०.८, धामणगाव रेल्वे ३७.५, वरूड २८.८, पवनी  ५१.२, भद्रावती ३२.८, जेवती ४७.९, कोर्पणा ५१, मूल २८.६, अहेरी ४३.१, अरमोरी ३०.५, भामरागड ४२.३, एटापल्ली २९.९, गडचिरोली ३९.६, मुलचेरा ४३.२, हिंगणा ४६.१, कळमेश्वर ३२.२, कामठी ४३.८, कुही ६३.६, नागपूर ११७.१, नरखेडा २७.५, पारशिवणी ४३.५, सावनेर ५०.१, उमरेड ३५.१, देवळी ३१.६, सेलू ३९.४, वर्धा ४५.३, कळंब ३०.


इतर अॅग्रो विशेष
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...