विदर्भात पूर्वमोसमीचा जोर वाढणार 

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : हिंद महासागराचा परिसर आणि अरबी समुद्राचा दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. पुढील दोन दिवसांत या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रिवादळ पुढे सरकण्याचा अंदाज आहे. तर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार होत असल्याने राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण बनून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक असल्याने लवकरच मॉन्सूनची स्थिती सक्रिय होऊ शकते. त्यामुळे राज्यातील तापमानात चढउतार होत आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील मालेगाव येथे सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर रात्रीही काही प्रमाणात उष्ण वारे वाहत असल्याने कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. परंतु काही ठिकाणी पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी हवेत गारवा तयार होत आहे.  सध्या वाऱ्यांचे प्रवाह बदलत असल्याने येत्या काळात विषुववृत्ताकडून अधिक प्रमाणात वारे वाहतील. सध्या हिंद महासागर व दक्षिण अरबी समुद्राच्या परिसरात चक्रिय वारे वाहत आहेत. तसेच विदर्भ व परिसर ते केरळ किनारपट्टी व मराठवाडा व कर्नाटक या दरम्यान चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर, विदर्भात चक्रिवादळाची स्थिती असल्याने पुढील काही दिवस विदर्भातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण विदर्भ  गुरुवार ः सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ  शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ  शनिवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा,संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 

मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३४.६ 
  • अलिबाग ३३.० 
  • रत्नागिरी ३५.१ 
  • डहाणू ३४.३ 
  • पुणे ३७.८ 
  • जळगाव ४२.२ 
  • कोल्हापूर ३६.८ 
  • महाबळेश्वर ३०.१ 
  • मालेगाव ४२.६ 
  • नाशिक ३७.३ 
  • सांगली ३८.८ 
  • सातारा ३८.१ 
  • सोलापूर ३८.६ 
  • औरंगाबाद ३९.८ 
  • परभणी ३९.५ 
  • उस्मानाबाद ३७.१ 
  • अकोला ४१.५ 
  • अमरावती ३९.० 
  • बुलडाणा ३९.९ 
  • ब्रम्हपुरी ४०.७ 
  • चंद्रपूर ३९.८ 
  • गोंदिया ३८.८ 
  • नागपूर ३८.६ 
  • वर्धा ४०.६  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com