agriculture news in Marathi rain will increased in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात पूर्वमोसमीचा जोर वाढणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे : हिंद महासागराचा परिसर आणि अरबी समुद्राचा दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. पुढील दोन दिवसांत या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रिवादळ पुढे सरकण्याचा अंदाज आहे. तर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार होत असल्याने राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण बनून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक असल्याने लवकरच मॉन्सूनची स्थिती सक्रिय होऊ शकते. त्यामुळे राज्यातील तापमानात चढउतार होत आहे.

मंगळवारी (ता. २०) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील मालेगाव येथे सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर रात्रीही काही प्रमाणात उष्ण वारे वाहत असल्याने कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. परंतु काही ठिकाणी पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी हवेत गारवा तयार होत आहे. 

सध्या वाऱ्यांचे प्रवाह बदलत असल्याने येत्या काळात विषुववृत्ताकडून अधिक प्रमाणात वारे वाहतील. सध्या हिंद महासागर व दक्षिण अरबी समुद्राच्या परिसरात चक्रिय वारे वाहत आहेत. तसेच विदर्भ व परिसर ते केरळ किनारपट्टी व मराठवाडा व कर्नाटक या दरम्यान चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर, विदर्भात चक्रिवादळाची स्थिती असल्याने पुढील काही दिवस विदर्भातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
बुधवार ः
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण विदर्भ 
गुरुवार ः सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ 
शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 
शनिवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा,संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 

मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३४.६ 
  • अलिबाग ३३.० 
  • रत्नागिरी ३५.१ 
  • डहाणू ३४.३ 
  • पुणे ३७.८ 
  • जळगाव ४२.२ 
  • कोल्हापूर ३६.८ 
  • महाबळेश्वर ३०.१ 
  • मालेगाव ४२.६ 
  • नाशिक ३७.३ 
  • सांगली ३८.८ 
  • सातारा ३८.१ 
  • सोलापूर ३८.६ 
  • औरंगाबाद ३९.८ 
  • परभणी ३९.५ 
  • उस्मानाबाद ३७.१ 
  • अकोला ४१.५ 
  • अमरावती ३९.० 
  • बुलडाणा ३९.९ 
  • ब्रम्हपुरी ४०.७ 
  • चंद्रपूर ३९.८ 
  • गोंदिया ३८.८ 
  • नागपूर ३८.६ 
  • वर्धा ४०.६  

इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...