agriculture news in Marathi rain will remain same Maharashtra | Agrowon

पावसाचा जोर कायम राहणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 

पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात मात्र जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

बंगाल उपसागराचा पश्चिम मध्य भाग ते बिहार उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा असून तो झारखंड, पश्चिम बंगाल आणि बंगाल उपसागराचा वायव्य भागापर्यंत आहे. समुद्रसपाटीपासून हा पट्टा ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच पश्चिम बंगालच्या पश्चिम मध्य भाग व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती ओडिशा, आंध्र प्रदेश या भागापर्यंत असून बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग ते ओडिशाच्या पश्चिम भागादरम्यान दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. समुद्रसपाटीपासून ही स्थिती ७.६ किलोमीटर उंचीवर असेल. 

उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा फिरोजपूर, कर्नाल, ग्वालियर, सतना, अंबिकापूर, छईबासा ते बंगाल उपसागराच्या वायव्य भागापर्यंत व ओडिशाचा उत्तर भाग आणि पश्चिम बंगाल या दरम्यान आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चांगल्या पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. 

कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून ही स्थिती आज आणि उद्या दिवस राहील. रविवारी (ता.१६) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही मंगळवारपर्यंत (ता.१८) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 
 
 


इतर अॅग्रो विशेष
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...