Agriculture news in marathi rain with winds in Ratnagiri, destried Fishing | Agrowon

रत्नागिरीत वाऱ्यांसह ढगाळ वातावरण; मासेमारीला फटका

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत असून, वातावरण ढगाळ आहे. वाऱ्‍यामुळे समुद्र खवळल्याने मासेमारीला फटका बसला आहे. हे वातावरण आणखीन दोन दिवस राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. थंडी लांबल्यामुळे आंबा, काजूला डिसेंबर महिन्यात मोहोर येण्याची शक्यता धुसर झाली आहे.

रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत असून, वातावरण ढगाळ आहे. वाऱ्‍यामुळे समुद्र खवळल्याने मासेमारीला फटका बसला आहे. हे वातावरण आणखीन दोन दिवस राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. थंडी लांबल्यामुळे आंबा, काजूला डिसेंबर महिन्यात मोहोर येण्याची शक्यता धुसर झाली आहे.

सोमवारी (ता. २) रात्री अचानक पावसाचे आगमन झाले. हलक्या सरींमुळे रत्नागिरी, लांजा, राजापूरसह काही भागांत शेतकऱ्‍यांची तारांबळ उडाली. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे भात झोडणीचे काम सुरू असताना पावसाने सुरुवात केली. मोकळ्या जागेवर ही कामे सुरू होती. झोडलेले भात आणि पेंढा सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तेथील शेतकऱ्यांची धावाधाव झाली. 

दोन दिवसांत चक्रीवादळ तयार होणार असून, ते वायव्यच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्याचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसणार नाही; मात्र ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. ३) रात्री वेगवान वारे वाहत होते. समुद्र खवळल्याने मच्छीमार भयभीत झाले आहेत. बुधवारी (ता.४) सकाळी एकही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली नाही. आंबा आणि काजूवर परिणाम होणार आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी पडेल अशी शक्यता होती; परंतु कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आंबा हंगामाला त्रासदायक ठरणार आहे. थंडी सुरू न झाल्यामुळे मोहोर येण्यास उशीर होईल, असे आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...