Agriculture news in Marathi, rainfall in 106 circles five districts | Agrowon

मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांतील १०६ मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी १०६ मंडळांत शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालन्यातील एकाही मंडळात पावसाची हजेरी लागली नाही. तर बीडमधील काही मंडळांसह उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता. लातूरमधील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ मंडळांपैकी केवळ कन्नड तालुक्‍यातील पिशोर मंडळात झालेला १५ मिलिमीटर पाऊस वगळता उर्वरित ६४ मंडळांत पावसाचा थेंबही पडला नाही. जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी एकाही मंडळात पाऊस झाला नाही. 

लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी १०६ मंडळांत शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालन्यातील एकाही मंडळात पावसाची हजेरी लागली नाही. तर बीडमधील काही मंडळांसह उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता. लातूरमधील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ मंडळांपैकी केवळ कन्नड तालुक्‍यातील पिशोर मंडळात झालेला १५ मिलिमीटर पाऊस वगळता उर्वरित ६४ मंडळांत पावसाचा थेंबही पडला नाही. जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी एकाही मंडळात पाऊस झाला नाही. 

बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई, केज आदी तालुक्‍यांतील २७ मंडळांत पावसाची हलकी मध्यम ते दमदार हजेरी लागली. परळी, माजलागाव, वडवणी, शिरूर कासार, गेवराई आदी तालुक्‍यांतही पाऊस झाला नाही. मांजरसुंभा मंडळात ३६ मिलिमीटर, नेकनुर २४, धामणगाव ४०, दौलावडगाव २०, घाटनांदूर २६, बर्दापूर ४८, कडा १८, पिंपळा १७, अंबाजोगाई १६, दासखेड ३९, चौसाळा १७ मिलिमीटर पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४६ मंडळांत पावसाने हजेरी लावली. हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाऊस पडला. जिल्ह्यातील तांदूळजा मंडळात ८५ मिलिमीटर तर वाढवणा बु. मंडळात ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर मंडळात १३ मिलिमीटर, कासारखेडा १४, गातेगाव १५, मुरूड १४, चिंचोली ब. १७, औसा ५४, भादा २१, बेलकुंड २४, रेणापूर २४, पोहरेगाव ४०, पानगाव ४०, हेर २१, नळगीर ३३, नागलगाव ४०, शिरूर ताजबंद १९, हाडोळती २५, वडवळ ना.२३, नळेगाव १८, शेळगाव ४१, जळकोट ३७, घोन्सी २५, कासारशिरसी ३५, मदनसुरी २२, औराद श. ११, निटूर २६, पानचिंचोली १८, वलांडी १६, हिसामाबाद १६ मिलिमीटर पाऊस झाला. 

उर्वरित मंडळात १ ते १५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३२ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील जागजी मंडळात ४५ मिलिमीटर, इटकळ ३५ मिलिमीटर, मुरूम ३२, नारगवाडी २४, कळंब २३, शरधोन ३१, येरमाळा २७, मोहा २४, गोविंदपूर २६, पारगाव २८, परंडा १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळात १ ते १४ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...