Agriculture news in marathi, Rainfall in 110 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११० मंडळांत शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाचा हा पाऊस राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११० मंडळांत शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाचा हा पाऊस राहिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी औरंगाबाद, पैठण, गंगापूर या तालुक्‍यातील केवळ ८ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. लोहगाव मंडळात ४२, तर शेंदूरवादा मंडळात ४० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते १० मिलिमीटर हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी केवळ  अंबड, भोकरदन, मंठा तालुक्‍यातील ४ मंडळांतच १ ते १२ मिलिमीटर पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी केवळ गंगाखेड मंडळात २ मिलिमीटर हजेरी लावली. इतर एकाही मंडळात पाऊस झाला नाही. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी कळमनुरी तालुक्‍यातील कळमनुरी, डोंगरकडा व वाकोडी मंडळांत २ ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. उर्वरित मंडळांकडे पावसाने पाठ फिरविली.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी नांदेड,  मुदखेड, भोकर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, मुखेड तालुक्‍यातील २० मंडळांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. मुदखेड मंडळात २१ मिलिमीटर, मगट ३३, भोकर ३०, निवघा ५३, तर देगलूरमध्ये ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळांत १ ते २० मिलिमीटर पाऊस झाला. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी धारूर, केज, अंबाजोगाई, पाटोदा, आष्टी व बीड तालुक्‍यातील २० मंडळांत तुरळक ते मध्यम पाऊस झाला. दौलावडगाव मंडळात ३५ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील तांदूळजा मंडळांत सर्वाधिक ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ लातूर २४ , कासारबालकुंदा येथे २५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. निलंगा, देवणी, जळकोट, औसा, रेणापूर, लातूर आदी तालुक्‍यातील २३ मंडळांत तो तुरळक राहिला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी गोविंदपूर मंडळांत सर्वाधिक ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ३१ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. तेर मंडळात ३१ मिलिमीटर, बेंबाळी ३१, पाडोळी ३२, केशेगाव ५१, तुळजापूर २४, मंगरूळ ४३, माकणी २४, शरधोन ३७, येरमाळा २४, वाशी ३९, तर तेरखेड्यात २२ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळात १ ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...