मराठवाड्यात काही भागात हलक्या सरी

मराठवाड्यातील १६५ मंडळांत पावसाच्या सरी
मराठवाड्यातील १६५ मंडळांत पावसाच्या सरी

औरंगाबाद : शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील १६५ मंडळांत पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक मंडळांत बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात मोजक्‍याच ठिकाणी तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री व गोंदी या दोन मंडळांतच अनुक्रमे ८४ व ६८ मिलिमीटर पाऊस बरसला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ५७ मंडळांत तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुष्काळाचा आजवर सामना करणाऱ्या पैठण तालुक्‍यासह सोयगाव तालुक्‍यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. सोयगाव  तालुक्‍यातील सोयगाव मंडळात सर्वाधिक ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पैठण तालुक्‍यातील बिडकीन ३६, लोहगाव ३६, बालानगर २५, आडूळ २३, विहामांडवा ३५, नांदर २४, पिंपळगाव पी २५, ढोरकीन २४, सिल्लोड तालुक्‍यातील अजिंठा २८, गंगापूर तालुक्‍यातील शेंदूरवादा २६, भेनडाला येथे २१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळात १ ते २० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांत पाऊस झाला. अंबड तालुक्‍यातील वडीगोद्री मंडळात सर्वाधिक ८४  मिलिमीटर, तर गोंदी मंडळात ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना तालुक्‍यातील रामनगर २९, विरेगाव ३२, पाचनवडगाव २५, वाग्रुळ जहांगीर ४०, धावडा २३, राजूर २५, केदारखेडा २४, टेंभूर्णी ४२, कुंभारझरी ३५, परतूर तालुक्‍यातील परतूर ३३.४०, सातोना ३७, आष्टी ४८, श्रीष्टी २८, वाटूर २८, मंठा तालुक्‍यातील मंठा २४, ढोकसाल २४, तळणी २०, पांगरी गोसावी २९, अंबड तालुक्‍यातील जामखेड मंडळात २०, रोहीलागड २८, सुखापुरी २२, घनसावंगी तालुक्‍यातील रांजणी मंडळात २२, तीर्थपुरी ४९, कुंभार पिंपळगाव ५६, आंतरवली टेंभी येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

बीड जिल्ह्यातील २१ मंडळांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. सर्वाधिक ३० मिलिमीटर पाऊस माजलगाव तालुक्‍यातील गंगामसला मंडळात नोंदला गेला. त्यापाठोपाठ माजलगाव २६, आडगाव २५, गेवराई तालुक्‍यातील जातेगाव मंडळात २०, तलवाडा २८ मिलीमिटर झालेली पावसाची नोंद वगळता उर्वरित तालुक्‍यात १ ते १९ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. 

उस्मानाबादमध्ये अदखलपात्र हजेरी

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, औसा, उदगीर, जळकोट या तालुक्‍यांमधील ६ मंडळांत तुरळक पावसाची हजेरी लागली. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. लोहारा तालुक्‍यातील जेवळी मंडळात झालेला १४ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक ठरला. उर्वरित मंडळात १ ते १२ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. त्यामुळे हा पाऊस फारसा दखलपात्र नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी, या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com