Agriculture news in marathi, Rainfall in 191 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील १९१ मंडळांमध्ये पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी १९१ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार हजेरी लावली. 

नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी १९१ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार हजेरी लावली. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांतील ७६ पैकी ५८ तालुक्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ११ मंडळांत, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ७ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २२ मंडळांत, हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी ६ मंडळांत, नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ३८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. लोहा, मुदखेड, माहूर, भोकर, उमरी, नायगाव तालुक्यांत जोरदार हजेरी लावली.

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी २९ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा तालुक्यांत उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३७ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब, वाशी, परंडा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४१ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, शिरूर कासार, अंबेजोगाई, केज तालुक्यांत दमदार सरी कोसळल्या.

मंडळनिहाय पाऊस (२० मिमीच्या पुढे) 

औरंगाबाद जिल्हा पिरबावडा २०, सिध्दनाथवडगाव ३७, 
 जालना जिल्हा ः सुखापुरी २७
जालना जिल्हा सुखापुरी २७
हिंगोली जिल्हा आजेगाव २०
नांदेड जिल्हा मुदखेड ३८, मुगट २३, सिंदखेड ३३, सरसम २६, भोकर २०, किनी ४७, सिंधी २५, मांजरम ३६, माळाकोळी ३३, कलंबर २७, कापशी ४९
लातूर जिल्हा तांदुळजा ५०, किल्लारी २८, मातोळा ३४, बेलकुंड २०, किनगाव २७, खंडाळी २३, औराद शहाजनी १२९ 
 उस्मानाबाद  जिल्हा बेंबाळी २५, केशेगाव ४०, तुळजापूर ४६, शिराढोण ३०, येरमाळा २२
बीड जिल्हा मांजरसुंभा २२, पाली २४, पाटोदा ३८, थेरला ३९, दासखेड ४५, पिंपळा ४७, शिरूर कासार ३०, रायमोहा ५७, बर्दापूर २४, विडा २१, युसुफवडगाव ६२, हनुमंत पिंपरी २५, बनसारोळा ३०.

  


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...