नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६ तालुक्यांंत पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६ तालुक्यांंत पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६ तालुक्यांंत पाऊस

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ तालुक्यांतील ९४ मंडळांमध्ये सोमवारी (ता. १६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सोमवारी (ता. १६) दुपार पर्यत अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू होता.

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ५३ मंडळांमध्ये पाऊस झाला. भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली, लोहा, नायगाव, मुखेड, नांदेड तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. माहूर, हदगाव, किनवट तालुक्यांत जोर कमी होता. परभणी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १२ मंडळांमध्ये पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम या पाच तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परंतु मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यात उघडीप होती. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २९ मंडळांमध्ये पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ःविष्णुपुरी ७, तामसा १२, मनाठा १७, पिंपरखेड १३, निवघा १५, आष्टी ६, किनवट १६, इस्लापूर १५, मांडवी ३१, बोधडी २७, दहेली ३६, जलधारा २१, शिवणी ८, माहूर ३२, वाई ४८, वानोळा १५, सिंदखेड ३९, हिमायतनगर १५, सरसम ६, जवळगाव ५, बरबडा १९, भोकर ५, किनी ८, उमरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com